IMPIMP

Pune Crime News | पुणे : तरुणीला मारहाण करुन अंगावरील कपडे फाडले, सात जणांवर FIR

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी सात जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी चार ते पाच या कालावधीत वानवडी येथील केदारीनगर येथे घडला होता. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 50 वर्षीय आईने शुक्रवारी (दि.26) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रीत कौर, क्रिस्टोफर जॉन बॉस्को, श्वेता उमेश शेट्टी, गजेंद्र सिंग गोविंदसिंग, सचिन कदम, जयेश गिरीश माली व एका महिलेवर आयपीसी 354, 354(अ), 323, 427, 504, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी यांची मुलगी सोसायटीच्या टेरेसवर फिरत होती. त्यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणवरुन मुलीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. आरोपी गजेंद्र गोविंदसिंग याने फिर्यादी यांच्या मुलीच्या अंगावरील कपडे फाडून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तिचा फोन खाली आपटुन नुकसान केले. याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे करीत आहे.

Related Posts