IMPIMP

Pune Crime News | भाड्याने घेतलेल्या आलिशान कारचा अवैध धंद्यांसाठी राजस्थानात वापर

by sachinsitapure
Pune Crime News | Use of rented luxury cars for illegal activities in Rajasthan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –Pune Crime News | झुम कार कंपनीकडून (Zoomcar Company) स्थानिक वापरासाठी काही हजार रुपयांमध्ये कार भाड्याने घेऊन त्या राजस्थानात (Rajasthan) अवैध धंद्यासाठी (Illegal Business) वापरल्यानंतर बेवारस सोडून दिल्याचे आढळून आले. तर एक गाडी परस्पर दुसर्‍याला विकल्याचे उघडकीस आले आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी गोरखनाथ राजाराम मोरे (वय ३७, रा. भोसरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७४/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे झुम कार इंडिया या कंपनीत मानवी संसाधन विभागात अधिकारी असून त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय बंगलोर येथे आहे. गाडी मालक त्यांच्या गाड्या कंपनीला लिझ वर नोंदणी करतात. कंपनी कस्टमर अ‍ॅपवर (Customer App) अशा नोंदणी झालेल्या कार त्यांच्या अ‍ॅपवर दिसत असते. त्याचा प्रती तास दरानुसार रक्कम दाखविली जाते. ज्या ग्राहकाला ती गाडी जेवढ्या तासाकरीता वापरण्यासाठी घेऊन जायचे असेल, तेवढे तासाचे पैसे हे ऑनलाईन कस्टमर अ‍ॅप्लीकेशनद्वारे बुकींग केली जाते. त्यानंतर ग्राहकाकडून सर्व माहिती वाहन चालविण्याचा परवाना घेऊन त्याने निवडलेली गाडी ज्या ठिकाणी आहे, तेथून घेऊन जाता येते व पुन्हा ठरल्यानुसार तेथे परत आणून द्यायचे असते.

धानोरी येथील एका गाडी मालकाची टाटा सफारी १० जुलै रोजी दुपारी जेसपारकुमार परमार (रा. आनंद, गुजरात) याने बुकिंग करुन तो घेऊन गेला. १२ जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत परत आणून द्यायचे ठरले होते. त्याने गाडी माघारी आणून दिली नाही. तेव्हा जीपीएस ट्रॅकरद्वारे ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाडीचा जीपीएस ट्रॅकर काढण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर टाटा कंपनीला कंपनीकडून देण्यात आलेले जीपीएस ट्रॅकरद्वारे गाडी ट्रेस केली असता ही गाडी बाडमेर जिल्ह्यामध्ये बाकासार परिसरात आढळून आले.

कंपनीने बाकासर पोलीस ठाण्याला (Bakasar Police Station) गाडीचे जीपीएस लोकेशन शेअर केले. त्याद्वारे पोलिसांनी शोध घेतल्यावर ती एके ठिकाणी बेवारस स्थितीत सोडल्याचे आढळून आले. बाकासर पोलिसांकडे चौकशी केल्यावर जेसपारकुमार परमार व त्याचा साथीदार नुरुल हक ऊर्फ सुफियान जे चौहान या दोघांनी मिळून अवैद्य व्यवसायासाठी ही कार राजस्थान येथे घेऊन गेले होते. नुरुल हक ऊर्फ सुफियान चौहान याने यापूर्वीही अशाप्रकारे कार अपहार करुन तिचा वापर अवैध धंद्यासाठी केला होता. तेव्हा त्याला चंदननगर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

दुसर्‍या घटनेत तर भाड्याने कार घेऊन त्यांनी तिचा अवैध धंद्यासाठी वापर केल्यानंतर बनावट कागदपत्रे
(Fake Documents) तयार करुन तिची परस्पर विक्री केल्याचे आढळून आले आहे.
वाघोली येथील किया कंपनीची सेलटॉस गाडी (Kia Seltos Car) कंपनीकडे नोंदणी झाली होती.
इस्माईल व्ही पी (रा. केरळ) याने २३ जुलै रोजी वैयक्तिक वापराकरीता बुक केली.
काम झाल्यावर ती परत आणून देणे आवश्यक असतानाही त्याने ती परत केली नाही.
कंपनीने बसविलेल्या जीपीएस द्वारे गाडी ट्रेस केली असता राजस्थानातील सांचौरमधील सिरोही गावात जीपीएस
काढण्यात आल्याचे लक्षात आले. कंपनीने गुजराम प्रतिनिधी हार्दिक पटेल यांना लोकेशनवर पाठविले.
त्यांनी परिसरात विचारणा केल्यावर गोविंदसिंग यांच्याकडे गाडी असल्याचे आढळून आले.
त्यांना प्रशांत सथाशीवम ऊर्फ रेड्डी (रा. तामिळनाडु, सध्या हिंजवडी) यांने पैसे घेऊन विक्री केल्याचे आढळून आले.
कंपनीने गाडी ताब्यात घेऊन मुळ मालकाच्या हवाली केली आहे.

पुण्यातून गाड्या भाड्याने घेऊन त्या अंमली पदार्थांच्या वाहतूकीसाठी वापरल्या जात असल्याचे यापूर्वीही आढळून आले आहे.

Web Title : Pune Crime News | Use of rented luxury cars for illegal activities in Rajasthan

Related Posts