IMPIMP

Pune Market Yard | 15 ऑगस्टला पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’

by sachinsitapure
Pune Market Yard | Market yard in Pune will be closed on August 15, 'Farmers should not sell farm produce'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) मार्केट यार्ड (Pune Market Yard) येत्या मंगळवारी (दि.15) बंद ठेवण्यात येणार आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Krushi Utpanna Bazar Samiti Pune) सभापती यांनी जाहीर केले आहे. येत्या मंगळवारी मार्केट यार्डातील (Pune Market Yard) मुख्य बाजार, मोशी (Moshi) उपबाजार, मांजरी (Manjari) उपबाजार, उत्तमनगर (Uttam Nagar) उपबाजार, खडकी उपबाजार (Khadki Sub Market) बंद राहणार आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्ड येथील फळे-भाजीपाला विभाग, केळी बाजार, गुरांचा बाजार, गुळभुसार विभाग, स्थापत्य विभाग, भांडार शाखा, छापाई लेखनसामुग्री, भुईकाटा केंद्र, पेट्रोलपंप विभाग, फुलांचा बाजार, पान बाजार, माती पाणी परिक्षण व अन्न भेसळ प्रतिबंधक प्रयोगशाळा बंद राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतमाल विक्रीस बाजारात आणू नये. मार्केट यार्ड बंद राहणार असल्याची नोंद व्यापारी,
व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title :  Market yard in Pune will be closed on August 15, ‘Farmers should not sell farm produce’

Related Posts