IMPIMP

Pune Crime News | कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन ऑफिसची तोडफोड, हडपसर येथील घटना

by sachinsitapure
Pune Crime News | Hadapsar Police Station - Wife was beaten and tortured for looking at her mobile phone

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन दोन तरुणांनी ऑफिसमध्ये शिरुन धारदार शस्त्राने सामानाची तोडफोड (Office Vandalism) केली. तसेच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण केली. हा प्रकार हडपसर येथील टीव्हीएस शोरूम (TVS Showroom) येथे बुधवारी (दि.13) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत सौरभ गौतम ओव्हाळ (वय-24 रा. हांडेवाडी पंढरी नगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अभिजित चव्हाण (वय-24), रोहित चव्हाण (वय-24 दोघे रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 427, 504, 34 सह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे 15 नंबर येथील टीव्हीएस शोरुम येथे काम करत होते. त्यांना कामावरुन काढून टाकले होते. याच कारणावरुन आरोपींनी बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी सोबत आणलेल्या लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या ऑफिसमधील संगणक, प्रिंटर व इतर वस्तूंची तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांना खुर्चीने व हाताने मारहाण करुन जखमी केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गव्हाणे (Police Constable Gavane) करीत आहेत.

Related Posts