IMPIMP

Pune Crime News | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

by sachinsitapure
Pune Police Crime Branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट पाचच्या (Unit -5) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 65 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.12) रात्री हडपसर येथील भोसले व्हिलेज सोसायटी जवळ असलेल्या मोकळ्या जागेत केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अमन संजय दिवेकर (वय-22 रा. जयहिंदनगर, अप्पर इंदिरानगर, पुणे), विशाल संजय लोखंडे (वय-24 रा. कांबळे वस्ती, अप्पर इंदिरानगर, पुणे) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींचे काही साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आयपीसी 399, 402 सह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, भोसले व्हिलेज सोसायटीच्या कमानी पाठिमागे असलेल्या मोकळ्या जागेत पाच संशयित बसले असून ते पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले. तर दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता विठ्ठल पेट्रोल पंपावर (Vitthal Petrol Pump) दिवसभरात जमा झालेले पैसे कॅशियरला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याकरीता जणार होतो असे सांगितले. आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य दोन मोबाईल जप्त केले आहेत. जप्त केलेले मोबाईल हे कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत रात्रीच्या वेळी कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याचे निष्पन्न झाले. तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी विशाल लोखंडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर हडपसर, स्वारगेट (Swargate Police Station),
बिबवेवाडी (Bibvewadi Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station),
कोंढवा पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत. तर अमन दिवेकर याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तीन गंभीर
गुन्हे दखल आहेत. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (PI Mahesh Bolkotgi), सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), पोलीस अंमलदार आश्रूबा मोराळे, प्रताप गायकवाड,
शहाजी काळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, अकबर शेख,
अमित कांबळे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, राहुल ढमढेरे, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, स्वाती गावडे व
संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

Related Posts