IMPIMP

Pune Crime News | सहकारनगरमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड; पूर्व वैमनस्यातून ऑफीस, दोन घरेही फोडली

by nagesh
Pune Crime News | Vehicles vandalized again in Sahakarnagar; Office, two houses were also broken due to previous enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून १० ते १५ जणांच्या टोळक्यांनी अरण्येश्वरमध्ये पहाटे रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविली आहे. टोळक्याने रस्त्यावरील वाहनेच नाही तर, एक ऑफिस व दोन घरांचे दरवाजावर दगड व कोयत्याने मारुन ते फोडले आहेत. संपूर्ण परिसरात दहशत पसरली होती. (Pune Crime News)

 

पूर्ववैमनस्यातून हा सर्व प्रकार घडल्याचे सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) सांगितले असून त्यातील ७ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अरण्येश्वर (Aranyeshwar) येथील अण्णाभाऊ साठेनगर (Annabhau Sathe Nagar) येथे पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही वहानांवर १० ते १५ जणांचा टोळके आले. त्यांनी आरडाओरडा करत हातातील कोयत्याने तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी कोयत्याने १ रिक्षा, १० दुचाकी, १ ऑफिस आणि २ घरांचे दरवाजे फोडले आहेत. या टोळक्याच्या आरडा ओरडामुळे घाबरुन कोणीही घरातून बाहेर आले नाही. बराच वेळ हा गोंधळ सुरु होता. काही वेळाने हे टोळके निघून गेल्यानंतर नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title : Pune Crime News | Vehicles vandalized again in Sahakarnagar; Office,
two houses were also broken due to previous enmity

Related Posts