IMPIMP

Pune Crime News | सोन साखळी चोरणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांकडून अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Wanwadi police arrested two people who stole gold chain, seized valuables worth two lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरणाऱ्या (Gold Chain Thieves) दोघांना वानवडी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) दाखल असलेले तीन गुन्हे (FIR) उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

गजानन दत्तात्रय बोराडे Gajanan Dattatraya Borade (वय-30 रा. हिवरकर मळा, सासवड), माऊली उर्फ ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण Mauli alias Dnyaneshwar Bhikaji Chavan (वय-22 रा. कुणेश्वर, सोलापूर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या एका महिलेने डिसेंबर 2022 मध्ये तक्रार दिली होती. फिर्यादी या मैत्रिणीकडे हळदी कुंकु च्या कार्यक्रमासाठी आधार हॉस्पिटल समोरील रस्त्यावरुन पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. (Pune Crime News)

 

वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane) हे गुन्ह्याचा तपास करत होते. त्यांनी एबीसी कॅटेगरी आरोपी चेक करत असताना गजानन बोराडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने त्याचा साथीदार माऊली चव्हाण याच्या मदतीने वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून 1 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा (IPS Ranjan Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख (DCP Vikram Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे (ACP Shahurao Salve)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Senior PI Bhausaheb Patare),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे,
पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अतुल गायकवाड, संतोष नाईक,
हरीदास कदम, संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, राहुल माने, यतिन भोसले, सोनम भगत यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime News | Wanwadi police arrested two people who stole gold chain, seized valuables worth two lakhs

Related Posts