IMPIMP

Pune Crime News | तडीपार गुंडाचा येरवड्यात राडा

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे व शहर जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात येऊन पालघनने येणार्‍या जाणार्‍यांना धमकावित येरवड्यात गुंड दहशत माजवित होता. येरवडा पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विजय गणेश राठोड Vijay Ganesh Rathore (वय २२, रा. नाईकनगर, येरवडा – Yerwada News) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल परदेशी (Police constable Rahul Pardeshi) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०८/२३) दिली आहे. विजय राठोड याला पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh) यांनी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असतानाही विजय राठोड हा शहरात रहात होता. रविवारी रात्री ८ वाजता तो गेनबा शाळेजवळ हातात पालघन घेऊन येणार्‍या जाणार्‍यांना शिवीगाळ करुन धमकावित होता. त्याच्या आरडाओरडामुळे लोक पळून जात होते. याची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड (Police Inspector Gaikwad), उपनिरीक्षक विशाल पाटील (Sub Inspector Vishal Patil) व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहून तो पळून जात होता. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. तडीपारीचा भंग करुन हत्यार बाळगल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Web Title :- Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

 

हे देखील वाचा :

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील

Shambhuraj Desai | कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

 

 

Related Posts