IMPIMP

Pune Crime News | स्वत:च्या घराला, गाडीला आग लावली अन् तमाशात जाऊन बसला, तरुणाचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले; पुणे जिल्ह्यातील घटना

by nagesh
Pune Crime News | youth sets own vehicle and home on fire in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | रागाच्या भरात तरुण मुलं काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील (Shirur Taluka) पिंपळ जगताप येथे घडली आहे. तरुणाने रागाच्या भरात स्वत:च्या घराला (Home) आणि गाडीला (Vehicle) आग लावली. हा प्रकार गावात जत्रा सुरु असताना घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजर झाले होते. पोलिसांनी आणि नागरिकांनी आग (Fire) विझवली. याप्रकरणी (Pune Crime News) पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रज्योत तांबे (Prajyot Tambe) असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे जगताप येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे याचे आई-वडील वाजेवाडी येथे गेले होते. त्याचवेळी त्याने घराच्या बाजूला पार्क केलेल्या गाडीला आग लागवी. त्यानंतर तो घरात शिरला आणि घरातील वस्तूंना आग लावली. गाडीने पेट घेतल्याने चारही टायर आणि गाडीच्या एसीच्या सिलेंडरचा स्फोट (AC Cylinder Explosion) झाला. त्यानंतर प्रज्योतने तिथून पळ काढला. यात गाडी जळून खाक झाली. (Pune Crime News)

 

घराला लागलेली आग पाहून शेजारी घाबरले. त्यांनी पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली.
शेजारी आग विझवेपर्यंत कार जळून खाक झाली होती. शिवाय घरातील सर्व धान्य, कपडे यांसह काही
महागड्या वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यापैकी एकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

 

प्रज्योतने गाडी आणि घराला आग लावली आणि गावात सुरु असलेल्या यात्रेतील तमाशात जाऊन बसला.
प्रज्योत तमाशात असल्याची माहिती पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी थेट तमाशात जाऊन त्याचा शोध घेतला.
त्यावेळी तो तमाशात रमलेला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | youth sets own vehicle and home on fire in pune

 

हे देखील वाचा :

Pathaan Housefull | पठाण चित्रपटामुळे काश्मिरमधील थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड

Prakash Ambedkar | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ वक्तव्याबाबत प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

Australian Open 2023 | ग्रँडस्लॅमसह निवृत्ती घेण्याचे सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

 

Related Posts