IMPIMP

Pathaan Housefull | पठाण चित्रपटामुळे काश्मिरमधील थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड

by nagesh
Pathaan Housefull | inox housefull sign back because of shah rukh khan pathaan in kashmir valley 32 long years

सरकारसत्ता ऑनलाईन – अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ (Pathaan Housefull) चित्रपटाची खूपच चर्चा होती. तर आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. तर अनेक ठिकाणी पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ऍडव्हान्स बुकिंग देखील झाल्याचे दिसत आहे. तर आता काश्मीर खोऱ्यातील एका थेटर बाहेर तब्बल 32 वर्षांनी हाउसफुलचा (Pathaan Housefull) बोर्ड लागला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मल्टिप्लेक्स चेन INOX Leisure Ltd यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती जाहीर केली आहे.
त्यांनी शेअर केलेल्या ट्विटर मध्ये म्हटले की, ” 32 वर्षानंतर काश्मीर खोऱ्यातील थेटरमध्ये हाउसफुलचा (Pathaan Housefull) बोर्ड लागला आहे. आम्ही किंग खानचे आभारी आहोत. धन्यवाद” सध्या हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पठाण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचे चित्रीकरण भारताबरोबरच स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये देखील केले आहे.

 

 

पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. तर चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग
या गाण्यांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.
या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण सोबतच जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया
हे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत . आता पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान लवकरच जवान आणि डंकी
या आगामी चित्रपटात देखील झळकणार आहे. तर शाहरुखने जवान चित्रपटातील त्याचा लुक देखील रिलीज केला
होता. एका कार्यक्रमादरम्यान राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान यांनी डंकी या चित्रपटाची घोषणा केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pathaan Housefull | inox housefull sign back because of shah rukh khan pathaan in kashmir valley 32 long years

 

हे देखील वाचा :

Prakash Ambedkar | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ वक्तव्याबाबत प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

Australian Open 2023 | ग्रँडस्लॅमसह निवृत्ती घेण्याचे सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

Maharashtra Politics | राज्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ला मिळू शकते घवघवीत यश; एका सर्वेच्या अहवालात ‘ही’ बाब उघड

 

Related Posts