IMPIMP

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; 38 मोबाईलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यात (Pune Crime) पीएमटी बसमध्ये (PMPML) गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरी (Mobile theft) होण्याचे प्रमाण वाढले आहे. बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 38 मोबाईल आणि एक महागडी चारचाकी गाडी असा एकूण 15 लाखाचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई स्वारगेट पीएमटी बस स्टॉपजवळ (Swargate PMT Bus Stop) केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

नागेश आप्पाना (वय-25 रा. मशिद कॉलनी ता. गुत्ते जि. गतकुल, आंध्र प्रदेश) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मारुती पारधी (Maruti Pardhi) यांना परराज्यातील एक व्यक्ती इर्टिगा गाडीतून (Ertiga car) येऊन बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करत असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वारगेट पीएमटी बस स्टॉपजवळ सापळा रचून एका लाल रंगाची इर्टिगा (केए 03 एनएफ 1824) मधील व्यक्तीला ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता त्याच्याजवळ वेगवेगळ्या कंपन्यांचे 4 लाख 85 हजार रुपये किंमतीचे 38 मोबाईल, त्याचे स्वत:चे 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 10 लाखांची गाडी असा एकूण 15 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला.

आरोपीकडे चौकशी केली असता त्याला मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान नसल्याने दुभाषिकामार्फत (Interpreter) चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने हे मोबाईल कात्रज चौक, पुणे मनपा बस स्टॉप व इतर ठिकाणाहून पीएमटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी 9 गुन्हे उघडकीस आणले असून इतर मोबाईल मालकांचा शोध घेतला जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 1 चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मनोज साळुंके,
विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Pune Crime | PMPML bus passenger’s mobile thief found in a foreign inn; 15 lakh items including 38 mobiles seized pune police crime branch Anti Narcotics Cell pune

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर रूग्णांमध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे, तुम्ही सुद्धा व्हा सावध

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

 

Related Posts