IMPIMP

Pune Crime | समर्थ आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे, 18 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील समर्थ (Samarth Police Station) आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या (Alankar Police Station) हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर (Matka Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापे टाकून 16 जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई (Pune Crime) गुरुवारी (दि.20) आणि शुक्रवारी (दि.21) करण्यात आली. या कारवाईत 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोके तालमीच्या मागे सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेवून गुरुवारी छापा टाकला. त्यावेळी पैशावर मटका जुगार घेणारे व मटका जुगार खेळणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या 8 आणि 1 पाहिजे आरोपी विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 34 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपींना समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

 

सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली.
पार्किंगच्या मोकळ्या जागेत मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पाळत ठेऊन पैशावर मटका घेणारे आणि खेळणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेऊन 62 हजार 70 रुपये जप्त
केले. एकूण 9 आरोपींवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला असून 8 जणांना पुढील कारवाईसाठी अलंकार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
अजय राणे, हणमंत कांबळे, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे, महिला पोलीस अंमलदार
मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime branch raids on illegal businesses in Samarth and Alankar police station limits, action taken against 18 people

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 83 जणांवर कारवाई

High Uric Acid च्या रूग्णांनी या गोष्टींची घ्यावी काळजी, वेदना आणि सूजपासून मिळू शकतो आराम

Pune NCP | शंभर रूपयांत नाही मिळत किट हिच भाजपची फसवणुकीची रित, राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर हल्लाबोल

 

Related Posts