IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! सार्वजनिक स्वच्छतागृहात महिलेला दोन महिला व पुरुषाने लुबाडले; हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | शहरातील रस्त्यावरुन मोबाईलवरुन बोलत जाण्याची चोरी झाली असताना आता शारीरीक गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहात जावे की जाऊ नये, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. बाथरुमसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहात गेलेल्या एका महिलेला दोन महिला व एका पुरुषाने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लुबाडल्याचा (Robbery) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी तुकाईदर्शन येथील एका ३४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११७३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोन महिला व राजा नावाच्या पुरुषावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसर येथील गाडीतळ बसस्टॉपच्या पलीकडील सार्वजनिक स्वच्छतागृहात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या बहिणीचा मुलगा हे तुकाईदर्शन येथून पीएमपी बसने हडपसर गाडीतळला आले होते. फिर्यादी यांना बाथरुमला लागल्याने त्या बसस्टॉपच्या पलीकडे असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात गेल्या. तेथे दोन अनोळखी महिला व राजा नावाचा पुरुष होता. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्कयांनी मारहाण केली. त्यांच्याकडील अडीच हजार रुपये रोख व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking! A woman was robbed by two women and a man in a public restroom; Incidents in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यात कर्तव्य बजावत असताना जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

Pune Rain | संततधार पावसामुळे पुण्यात मुठेला पूर ! खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक विसर्ग

CM Eknath Shinde | वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Property Card | महाराष्ट्रातील २६ हजार गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण; 9 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप

 

Related Posts