IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! वर्गात घुसून 10 वी च्या विद्यार्थीनीवर चाकूने सपासप वार, पुण्यातील खळबळजनक घटना

by nagesh
Pune Crime | Shocking ! Young boy stabbed 10th std young girl in school Farewell Ceremony vadgaon sheri of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | लवकरच दहावीच्या ऑफलाईन परीक्षा (10th Exam Offline) सुरु होणार असून प्रत्येक शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी निरोपसमारंभ (Farewell Ceremony) आयोजित केले जात आहे. मात्र, पुण्यातील (Pune Crime) एका शाळेमध्ये निरोपसमारंभ सुरु असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून एका विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार (Boy Stabbed Young Girl) केले. या घटनेमुळे परिसरात आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील इनामदार शाळेत (Inamdar School) घडला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून त्यावेळी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ सुरु होता. आरोपी तरुण हातात चाकू (Knife) घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली. (Pune Crime)

 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीवर वार केल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरुन पळून (Accused Fled) गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Shocking ! Young boy stabbed 10th std young girl in school Farewell Ceremony vadgaon sheri of pune

 

हे देखील वाचा :

Mouni Roy Gorgeous Look | मौनी रॉयच्या ‘या’ मनमोहक अदामुळं तुम्हीही व्हाल मोहित, पारंपारिक ड्रेस घालून सोशल मीडियावर केला कहर

Solapur Crime | पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात, 4 वारकऱ्यांचा मृत्यू

Weight Loss Fruits | उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर बॉडी हायड्रेट ठेवणार्‍या ‘या’ 6 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

 

Related Posts