IMPIMP

Pune Crime | ‘वसुली’साठी अपहरण करुन 4 दिवस ठेवले डांबून; सिंहगड रोड पोलिसांकडून दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | Punit Chandanmal Jain, who was betting on South Africa match against India, was arrested pune police crime branch seized Rs 3 lakh from him

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | व्यवसायासाठी दिलेले हात उसने पेसे परत न केल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाला
सिंहगड रोडवरुन (Sinhagad Road) अपहरण करुन (Kidnapping Case) चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी
सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) 6 जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सनी सुनिल छजलाणी Sunny Sunil Chhajlani (वय 31, रा. केशवनगर, मुंढवा) आणि सलमान /उमर समीर शेख (वय 24, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच पक्या, अभिजित, मयुर, शादाब अशा इतरांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

हा प्रकार सिंहगड कॉलेज कॅम्पस (sinhgad college campus) येथील क्युबाना कॅफे येथून सिंहगड रोडवरील गोयलगंगा येथे 10 ते 14 जानेवारी दरम्यान घडला. याप्रकरणी राहुल चव्हाण (वय ३१, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण व त्यांचा भाऊ गोविंद चव्हाण यांनी व्यवसायासाठी सनी छजलाणी याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. हे पैसे परत न केल्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. राहुल हा 10 जानेवारी रोजी क्युबाना कॅफे येथे असताना सनी इतरांना घेऊन तेथे आला. त्याने राहुल याला मारहाण करुन जबरदस्तीने त्याचे अपहरण करुन आपल्या घरी नेले. तेथे त्याला डांबून ठेवले. त्या ठिकाणी मारहाण करुन पैसे परत नाही केले तर तुला जिंबत सोडणार नाही, अशी धमकी दिली. 14 जानेवारी रोजी सुटका केल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Sinhagad Road Police Arrest Two In Kidnapping Case 

हे देखील वाचा :

Modi Government | महाराष्ट्र सरकारला खोटे ठरवण्याचा डाव? मोदी सरकारकडून ‘ते’ वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा

Uttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार ‘समाजवादी पार्टी’त

Almond And Raisins Benefits | ‘या’ वेळी खा बदाम आणि बेदाणे एकत्र, ‘हे’ आजार दूर राहतील; तुम्हाला मिळतील 7 आश्चर्यकारक फायदे

Related Posts