IMPIMP

Pune Crime | धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Milind Ekbote Nandkishore Ekbote granted pre-arrest bail but barred from entering Pune Municipal Corporation area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पुण्येश्वर मंदिर (Punyeshwar Mahadev Mandir Pune) येथील दर्गाच्या बांधकामाला (Darga Construction) न्यायालयाची स्थगिती (Court Stay Order) असताना व तेथे काम सुरु नसताना काम सुरु असल्याचे सांगून महाआरती (MahaArti) करुन दिशाभूल करणारी पत्रके वाटून (Distribution Pamphlet) दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा (Rift Between The Two Societies), यासाठी प्रयत्न केल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (Hindutva Leader Milind Ekbote) यांच्यासह फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) २० जणांवर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी पवळे चौकात (Pawale Chowk Kasba Peth) सर्वांनी एकत्र येऊन तेथे महाआरती केली. तसेच सोशल मीडियावर (Social Media) दिशाभूल करणार्‍या पोस्ट (Misleading Posts On Social Media) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुनिल सदाशिव तांबट (वय ५३, रा. कसबा पेठ), स्वप्नील अरुण नाईक (वय ३६, रा. गुरुवार पेठ) मुकुंंद मारुतीराव पाटोळे (वय ६२, रा. मंगळवार पेठ), मिलिंद रमाकांत एकबोटे (वय ६५, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), नंदकिशोर रमाकांत एकबोटे (वय ६०, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), योगेश भालचंद्र वाडेकर (वय ४१, रा. शुक्रवार पेठ), कुणाल सोमेश्वर कांबळे (वय ३९, रा. नवी सांगवी),

 

 

 

रवींद्र राजेंद्र ननावरे (वय ३३, रा. पर्वती दर्शन), संतोष कमलाकर अनगोळकर (वय ४४, रा. धनकवडी), धारुदत्त वसंत शिंदे (वय ५२, रा. सहकारनगर), धनंजय मारुती गायकवाड (वय ५१, रा. सदाशिव पेठ), प्रशांत प्रकाश कांबळे (वय २४, रा. मंगळवार पेठ), देवीसिंग मोहनसिंग दशाना (वय १८, रा. कसबा पेठ), विकी रमेश चव्हाण (वय २५, रा. कसबा पेठ), आदित्य ज्ञानेश्वर कांबळे (वय १८, रा. कसबा पेठ), विश्वजीत ज्ञानदेव भिसे (वय २३, रा. हमालनगर, मार्केटयार्ड), आकाश प्रभाकर माने (वय १९, रा. चव्हाणनगर, पद्मावती), पार्थ जय प्रकाश पांचाळ (वय २१, रा. नर्‍हे), आदित्य संतोष राजपूत (वय १८, रा. पद्मावती) आणि वैभव वाघ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे व नंदकिशोर एकबोटे, वैभव वाघ वगळता इतरांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध समाजमाध्यमांवर सुनियोजितरित्या कट रचून (Conspiracy) दोन समाजामध्ये धार्मिक तेढ होणारे मजकूर असलेले संदेश, व्हिडिओ व निमंत्रण पत्रिका (Messages, Videos And Invitation Card) या सोशल मीडियावर प्रसारीत करुन सर्व हिंदु (Hindu) धर्मीय लोकांना आवाहन केले. त्यांना पवळे चौकात एकत्र जमवले. तेथे महाआरती केली.

 

 

पोलीस सह आयुक्त (Jt CP Pune) यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग (Violation Of Restraining Order) केला. तसेच कार्यक्रमस्थळी वाटप केलेल्या पुस्तिकेमध्ये येथील विवादित ठिकाणी न्यायालयाची स्थगिती असून कोणत्याही प्रकारचे बांधकाम चालू नसताना तेथे काम चालू असल्याबाबत दिशाभूल व दोन समाजामध्ये तेढ, द्वेष निर्माण व्हावा, या उद्देशाने मजकूर छापलेला आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Narnavare) ,
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोेवेकर (ACP Satish Govekar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Police Inspector Rajendra Landge),
पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Police Inspector Shabbir Syed) यांनी भेट दिली
असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त (Police Bandobast) ठेवण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Crime | Trying to create a religious rift ! A case has been registered against 20 persons including Milind Ekbote, working president of Samast Hindu Aghadi in Pune

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 91 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ramdas Athawale In Pune | महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला 25 जागा हव्यात; रामदास आठवले म्हणाले – ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’

Old Income Tax Regime | टॅक्सपेयर्ससाठी मोठा झटका ! Old Tax Slab व्यवस्था होऊ शकते बंद, महसूल सचिवांनी दिला सल्ला

Related Posts