IMPIMP

Pune Crime | जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या होर्डिंगवरुन तरुणाने मारली उडी, पुण्यातील घटना

by nagesh
Pune Crime | young man jumps 35 foot high billboards incident near pune railway station in juna bazar road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एका तरुणाने जाहिरातीच्या 35 फुट उंचींच्या बोर्डावरुन उडी (jump) मारल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune railway station) आवारात गुरुवारी (दि.23) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पुणे लोहमार्ग पोलिसांनी (Pune Railway Police) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास एक अनोळखी तरुण पुणे रेल्वे स्थानक आवारात असलेल्या जाहिरातीच्या बोर्डावर (Advertising hoardings) चढला. या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ (RPF), लोहमार्ग पोलीस, स्थानिक पोलिसांनी (Local Police) घटनास्थळी धाव घेतली. तरुणाला खाली उतरण्यास सांगण्यात आले. परंतु तो खाली उतरत नसल्याने त्याला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाला (fire brigade) पाचारण करण्यात आले.

 

अग्निशमन दलाचे कर्मचारी संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांनी लोकांच्या मदतीने खाली मोठी जाळी घेऊन उभे राहिले.
त्याचवेळी काही तरुण होर्डिंगवर चढून त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी या तरुणाने 35 फूटावरुन उडी मारली.
यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

 

Web Title :- Pune Crime | young man jumps 35 foot high billboards incident near pune railway station in juna bazar road

 

हे देखील वाचा :

Pune Police | आता पुण्यातही महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,933 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tata Group | जेफ बेजोस यांची अमेझॉन आणि अंबानींच्या जिओमार्टला टक्कर देणार टाटाचे हे सुपरअ‍ॅप, नवीन वर्षात होणार लाँच

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts