IMPIMP

Pune Cyber Police | तुमच्या सोशल मीडियावरील ‘मेसेज’वर पोलिसांचा ‘वॉच’, वेळप्रसंगी जेलमध्ये…

by nagesh
Pune Cyber Crime News | 16 lakh fraud on the pretext of completing an online task on a Telegram group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनसध्या बहुतांश व्यक्तींकडे स्मार्ट फोन (Smart Phone) असून त्यामध्ये सोशल मीडिया (Social Media) वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रत्येकाचे आपापले ग्रुप असतात. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची बदनामी (Defamation of Women On Social Media) होण्याचे प्रमाण वाढले आहेत. याबाबत पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) अनेक तक्रारी प्राप्त झाल्या (Pune Cyber Crime) आहेत. पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) वर्षभरात 4357 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आता तुमच्या सोशल मीडियावरील मेसेजवर पोलिसांची नजर असणार आहे. अश्लील, घाणेरड्या भाषेत कमेंट करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर (Police Watch On Social Media) असणार आहे. एखादा आक्षेपार्ह संदेश (Offensive Message) आढळून आल्यास तुमच्यावर गुन्हा (FIR) दाखल होऊ शकतो, वेळप्रसंगी जेलची (Jail) हवा ही खावी लागू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रेमसंबंधादरम्यान काढण्यात आलेले व्हिडीओ ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर प्रियकराकडून सोशल मीडियात व्हायरल केले जातात. तसेच तिच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज सामाजिक माध्यमांवर पसरवून मुलीची बदनामी करुन आपला राग व्यक्त करण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. एकीकडे महिलांची बदनामीचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) जाळ्या पुरुषांना ओढून त्यांच्याकडून खंडणी (Ransom) वसूल करण्याचे प्रकार पुणे शहरात (Pune City Police) घडताना पाहायला मिळत आहेत.

 

पुणे पोलिसांचे वाढवले काम
पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) 2021 मध्ये 1 हजार 514 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) यावर बनावट प्रोफाइल (Fake Profile) बनवणे, अश्लील कमेंट (Pornographic) करणे, अश्लील पोस्ट करणे, याशिवाय माहिती चोरल्याच्या तक्रारी आल्या आहेत. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवून मित्र झाल्यानंतर फसवणूक केल्याच्या 263 तक्रारी आल्या आहेत. तसेच नग्न व्हिडीओ कॉलच्या (Nude Video Calls) मध्यमातून सेक्सटॉर्शनच्या 682, फेसबुक प्रोफाईल हॅक करुन अश्लील मेसेज पोस्ट करण्याच्या 465 तक्रारी पुणे सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील वर्षात 4357 तक्रारी
पुणे सायबर पोलिसांकडे मागील वर्षाअखेर 4357 तक्रारी आल्या होत्या. यामध्ये 1 हजार 474 तक्रारी प्रलंबित राहिल्या होत्या. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीमध्ये हॉट्सअ‍ॅपवर अश्लील कमेंट केल्याच्या 466, सोशल मीडियावर मोबाईल नंबर पोस्ट केल्याच्या 12, यु – ट्यूबवर अश्लील व शिवराळ व्हिडीओ अपलोड केल्याच्या 48, ई – मेलद्वारे अश्लील मेसेज 73, समाज माध्यमांवर बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केल्याच्या 144 तक्रारींचा समावेश आहे. याशिवाय कोरोना महामारी संदर्भात (Corona Epidemic) अफवा पसरविल्याच्या 6, बदनामी करणाऱ्या पोस्ट पसरविल्याच्या 314, झूम मीटिंग (Zoom Meeting) सुरु असताना अश्लील कमेंटच्या 10, बनावट ईमेल आयडी तयार केल्याच्या 88, सोशल मीडियात अक्षेपार्ह धार्मिक कमेंटच्या 80, मॉर्फिंग अशा तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.

 

…तर पडेल महागात
जर तुम्ही घाणेरड्या कमेंट आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर करत असाल, तर तुमच्यावर आयटी अ‍ॅक्ट (IT ACT) नुसार गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते. आयटी अ‍ॅक्टच्या कलम 66 ए नुसार खोट्या आणि आक्षेपार्ह कमेंट केल्यातर कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. तुम्हाला जर तुमच्या सहमतीशिवाय कोणी फोटो, व्हिडिओ पाठवत असेल आणि त्यामध्ये त्रास देणे, धोका, अपमान, दोन गटांमध्ये तणाव तसेच गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले जात असेल तर कमीत कमी तीन वर्षे आणि दंडाची तरतूद आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांकडून काळजी घेण्याचे आवाहन
पुणे सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके (Senior Police Inspector D.S. Hake) यांनी सांगितले की, समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना तुमच्याकडून कोणाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.
एखाद्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुरुंगात देखील जावे लागेल.
याचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ शकतो. त्यामुळे समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना प्रत्येकाने संभाळून व्यक्त झाले पाहिजे.
तसेच समाज माध्यमांवर मेसेज अथवा कमेंट करु नका. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेज पाठवू नका.
जर एखादा आक्षेपार्ह मेसेज आला तर त्याचा स्क्रिनशॉट काढा आणि याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्या.

 

Web Title :- Pune Cyber Police | Pune Cyber Crime Police Watch On Your Social Media Accounts Messages

 

हे देखील वाचा :

Bees Attack on Pune IT Engineers | सिगारेटच्या धुराने केला घात ! फिरायला गेलेल्या पुण्यातील IT इंजिनिअर्सवर मधमाशांचा हल्ला; 11 जखमी तर काही बेशुद्ध

Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids | किरीट सोमय्यांचा शिवसेनेच्या नेत्यावर निशाणा, म्हणाले – ‘मातोश्री’ला वाचविण्यासाठी स्वत:च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते’

Oscars 2022 Winners List | समोर आली ‘Oscar 2022’ विजेत्यांची पूर्ण यादी, जाणून घ्या भारताच्या झोळीत काय पडलं ?

 

Related Posts