IMPIMP

Bees Attack on Pune IT Engineers | सिगारेटच्या धुराने केला घात ! फिरायला गेलेल्या पुण्यातील IT इंजिनिअर्सवर मधमाशांचा हल्ला; 11 जखमी तर काही बेशुद्ध

by nagesh
Bees Attack on Pune IT Engineers | bees attack on it engineers of pune in lonavala many injured

लोणावळा : सरकारसत्ता ऑनलाइनलोणावळ्याजवळ (Lonavala) फिरण्यासाठी गेलेल्या आयटी अभियंत्यांच्या (IT Engineers In Pune)
ग्रुपवर मधमाशांनी हल्ला (Bees Attack on Pune IT Engineers) केला. मधमाशांनी शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतल्याने, अनेकांची अवस्था
दैनिय झाली. मधमाशांनी घेतलेल्या चाव्यामुळे (Bees Attack on Pune IT Engineers) काही जणांना व्यवस्थित चालता पण येईना. तर काही जण
बेशुद्ध (Unconscious) पडले. अखेर वन्य जीव संस्था मावळ (Maval Wildlife Institute) आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने (Shivdurg Rescue Team)
त्या 11 जणांची सुटका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) आयटी इंजिनिअर्सचा 11 जणांचा ग्रुप रविवारी सकाळी लोणावळ्यात फिरण्यासाठी आला होता. या
ग्रुपमध्ये काही तरुणींचा ही समावेश होता. हा ग्रुप कातळधार धबधब्याच्या (Steep Waterfall) दरीत उतरत होता. त्यावेळी ग्रुपमधील काहीजणांनी
धुम्रपान (Smoking) केले आणि धूर आगी मोहोळाच्या दिशेने गेला. त्यामुळे मधमाशा उठल्या आणि त्यांनी या ग्रुपवर हल्ला (Bees Attack on Pune
IT Engineers) केला.

 

 

आगी मोहोळाच्या माशांनी शरीरावर ठिकठीकाणी चावा घेतल्याने ग्रपमधील काही जणांना चालणे कठीण झाले. तर काहींनी आहे त्याच ठिकाणी झोपून राहिले. मधमाशांच्या चाव्यामुळे काहीजण बेशुद्ध झाले. शुद्धीवर असणाऱ्यांनी यंत्रणांशी संपर्क साधला. त्यानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या.

 

 

बेशुद्ध झालेल्या तरुणांना शुद्धीवर आणून त्यांच्या हाताला धरून दरीतून बाहेर काढण्यात आले. दुपारी 12 ते सायंकाळपर्यंत हे बचावकार्य सुरु होते. ग्रुपमधील दरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारचा दिवस असल्याने हे सर्वजण पिकनीक साठी आले होते.

 

web title : Bees Attack on Pune IT Engineers | bees attack on it engineers of pune in lonavala many injured

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya On Yashwant Jadhav IT Raids | किरीट सोमय्यांचा शिवसेनेच्या नेत्यावर निशाणा, म्हणाले – ‘मातोश्री’ला वाचविण्यासाठी स्वत:च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते’

Oscars 2022 Winners List | समोर आली ‘Oscar 2022’ विजेत्यांची पूर्ण यादी, जाणून घ्या भारताच्या झोळीत काय पडलं ?

Ajit Pawar On Sujay Vikhe Patil | ‘ज्यांना काही उद्येाग नाहीत ते टीका करतात, त्यांना…’ – अजित पवार

 

Related Posts