IMPIMP

Pune Fire News | पुण्याच्या शिवणेत 15 वाहने पेटविली; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

by nagesh
Pune Crime News | Exciting! 2 children including a woman were killed and the bodies were burnt; Incident in Kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Fire News | शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज (Shivkamal Prestige, Shiavane) या इमारतीच्या पार्किंगमधील 13 दुचाकी आणि 2 रिक्षा यांना आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे घडला. अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या बंबांनी (PMRDA) ही आग तातडीने विझवली. मात्र, तोपर्यंत ही 15 वाहने जळून खाक झाली होती. कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. (Pune Fire News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही 5 मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे 5 वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली. पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएची गाडी घटनास्थळी पोहचली. त्यापर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली. (Pune Fire News)

 

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, इमारतीतील मीटरचे बॉक्स व्यवस्थित होते. फक्त पार्किंगमध्ये लावलेली ट्युब लाईट जळाली. इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, आम्ही आवाज आल्याने खाली आलाे. तेव्हा सर्व वाहने एकाच वेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे त्यांनी सांगितले. उत्तमनगर पोलीस (Uttam Nagar Police Station) घटनास्थळी पोहचले असून ते माहिती घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Fire News | 15 vehicles set on fire in Pune; Citizens suspect deliberate arson

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात मांजरीला वाचविताना तरुण पडला वेताळ टेकडीवरील खाणीत; अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर

Multibagger Stocks | ‘या’ 5 स्टॉकने गुंतवुणकदारांना बनवले लखपती, दिला 22,300 टक्के रिटर्न

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी लागणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंच

 

Related Posts