IMPIMP

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात

by nagesh
Pune Hadapsar Fire | Hadapsar Gadital Six Shop Fire

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील दुकानांना मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत ६ दुकाने जळून भस्मसात झाली. अग्निशामक दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांना ४० मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यास यश आले. (Pune Hadapsar Fire)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हडपसरच्या गाडीतळावर एकाशेजारी एक अशी दुकाने आहेत. मध्यरात्री साडेबारा वाजता या दुकानांना आग लागली. याची खबर अग्निशामक दलाला १२ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर २ बंब आणि २ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले. गाड्या पोहचेपर्यंत आगीने मोठे रौद्र रुप धारण केले होते.

 

याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी सांगितले की, गाडीतळावरील ही दुकाने एका रांगेत आहेत. त्यात ४ चप्पलची व २ फळांची दुकाने होती. त्यातील एका दुकानात २ जण झोपलेले होते. आगीमुळे झालेल्या आरडाओरड ऐकून ते जागे झाले व बाहेर आले. या आगीत ६ दुकाने जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण अजून समजले नाही. अग्निशामक दलाने ही आग ४० मिनिटांमध्ये आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

 

Web Title :- Pune Hadapsar Fire | Hadapsar Gadital Six Shop Fire

 

हे देखील वाचा :

Gas Problem And Acidity | गॅसची समस्या झाल्यास चॉकलेट खावे का? अ‍ॅसिडिटी आणि कोको पावडरमध्ये जवळचा संबंध; जाणून घ्या

Urinary Tract Infection Symptoms | वारंवार लघवीला होणे असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण, खाण्या-पिण्यात तात्काळ करा बदल; जाणून घ्या

Pune Crime | पुणे-मुंबई रोडवरील आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजवर गुन्हे शाखेचा छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विपुल बेलदरेसह 5 जणांवर

 

Related Posts