IMPIMP

Urinary Tract Infection Symptoms | वारंवार लघवीला होणे असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण, खाण्या-पिण्यात तात्काळ करा बदल; जाणून घ्या

by nagesh
Urinary Tract Infection Symptoms | what are the symptoms of urinary tract infection know how to control it by diet

सरकारसत्ता ऑनलाइन – Urinary Tract Infection Symptoms | वारंवार लघवी होणे ही अशी समस्या आहे, जिच्याकडे स्त्रिया (Women Health) किरकोळ गोष्ट समजून दुर्लक्ष करतात. तुम्हाला माहित आहे की वारंवार लघवीला होणे हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन (Urinary Tract Infection) चे कारण असू शकते. हे युरिनरी ट्रॅकच्या कोणत्याही भागातील इन्फेक्शन असे शकते. जेव्हा मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात बॅक्टेरिया (Bacteria) जमा होतात तेव्हा त्या भागात सूज आणि जळजळ होते (Urinary Tract Infection Symptoms).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या बॅक्टेरियामुळे मूत्रमार्गात सूज निर्माण होते, ज्यामुळे लघवी करताना जळजळ होऊ शकते. बॅक्टेरिया मूत्रमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि ब्लॅडर आणि किडनीचे नुकसान (Bladder And Kidney Damage) करतात.

 

महिलांमध्ये युरिन इन्फेक्शनची तक्रार किशोरावस्थेपासूनच दिसून येते. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, महिलांना त्यांच्या आयुष्यात युरिन इन्फेक्शन नक्कीच होते. या संसर्गाची कारणे काय आहेत आणि या आजारावर आहाराने कसा उपचार करावा हे जाणून घेऊया (Urinary Tract Infection Symptoms).

 

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची कारणे (Causes Of Urinary Tract Infection) :

लघवी केल्यानंतर मूत्रमार्ग मागून पुढच्या बाजूपर्यंत पुसल्याने बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे संसर्ग वाढतो.

 

पुरुषांपेक्षा स्त्रियांचा मूत्रमार्ग लहान असतो, ज्यामुळे बॅक्टेरिया मूत्राशयात सहज प्रवेश करतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

संभोग करताना मूत्रमार्गात बॅक्टेरियांनी प्रवेश केल्यामुळे देखील संसर्ग होऊ शकतो.

 

सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्याने बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे संक्रमणाचा धोका असतो.

 

जेव्हा टॉयलेटच्या घाणेरड्या पाण्याचे थेंब उडतात तेव्हा बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात.

 

हार्मोनल बदल, मल्टिपल स्क्लेरोसिस, किडनी स्टोन, स्ट्रोक आणि पाठीच्या कण्याची दुखापत (Hormonal Changes, Multiple Sclerosis, Kidney Stone, Stroke And Spinal Cord Injury) लघवीवर परिणाम करते.

 

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी, आहारात करा या पदार्थांचा समावेश (To Prevent Urinary Tract Infection, Include These Foods In Diet) :

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. द्रव पदार्थांचे सेवन करा (liquid diet ) :
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या (Drink Plenty Water). द्रव पदार्थांचे सेवन केल्याने लघवी पातळ होते. जास्त द्रवपदार्थ सेवन केल्याने संसर्ग सुरू होण्यापूर्वी तुमच्या मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर पडतात.

 

2. करवंदाचा ज्यूस प्या (Drink Cranberry Juice) :
करवंद (Cranberry) हे अतिशय चवदार आणि लाभदायक फळ आहे. याच्या ज्यूसमुळे यूटीआयला (UTI) प्रतिबंध होतो आणि आरोग्याला फायदा होतो. संसर्ग कमी करण्यासाठी तुम्ही या ज्यूसचे सेवन करू शकता.

 

3. आवळा ज्यूस सेवन करा (Consume Amla Juice) :
व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने समृद्ध आवळा खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत (Immunity Strong) होते, तसेच युरिन इन्फेक्शनपासून बचाव होतो. युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवळ्याचा ज्यूस दिवसातून 4-5 वेळा प्या.

 

4. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर प्रभावी (Apple Cider Vinegar Is Effective) :
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर युरिन इन्फेक्शन रोखण्यासाठी खूप प्रभावी आहे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये लिंबाचा रस आणि मध (Honey) मिसळून वापरा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5. या सवयींचा करा अवलंब (Change These Habits Too) :

– लघवी केल्यानंतर पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा (Tissue Paper) वापर करा.

– संभोगानंतर लगेच लघवी करा, ज्यामुळे ब्लॅडर रिकामे होईल.

– एक ग्लास पाणी प्या म्हणजे बॅक्टेरिया लघवीद्वारे बाहेर पडतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Urinary Tract Infection Symptoms | what are the symptoms of urinary tract infection know how to control it by diet

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे-मुंबई रोडवरील आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजवर गुन्हे शाखेचा छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विपुल बेलदरेसह 5 जणांवर

Bombay High Court | रात्री उशीरापर्यंत फिरणार्‍यांना कधीही प्रश्न विचारू शकतात पोलीस, मुंबई HC ची टिप्पणी

Pune Crime | टेम्पो मागे घेण्यास सांगितल्याने गुंडाच्या टोळक्याने कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण; पिसोळी येथील घटनेत तिघा सराईतांना अटक

 

Related Posts