IMPIMP

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक : काँग्रेस पक्षातील बंडखोरी उघड; नाराज बाळासाहेब दाभेकर भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

by nagesh
Pune Kasba Peth Bypoll Election | rebellion in congress in pune angry balasaheb dabhekar will file nomination form tomorrow

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  काँग्रेस पक्षाकडून (Congress Party) कसबा विधानसभा मतदारसंघात (Pune Kasba Peth Bypoll Election) उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेले बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. बाळासाहेब दाभेकर हे दि. ७ आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

काँग्रेस पक्षाकडून कसबा पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी बाळासाहेब दाभेकर यांनी केली होती. उमेदवारी न दिल्यास बंडखोर म्हणून लढण्याची भूमिका देखील बाळासाहेब दाभेकर यांनी जाहीर केली होती. मात्र, तरीदेखील काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर नाराज झालेल्या दाभेकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. दाभेकरांच्या या भूमिकेमुळे हा काँग्रेस पक्षासाठी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दाभेकर यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
नारायण पेठ येथील मोदी गणपती मंदिरापासून दुचाकी फेरी काढण्यात येणार असून केसरीवाडा,
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामार्गे गणेश कला क्रिडा रंगमंच असा दुचाकीच्या फेरीचा मार्ग असणार आहे.
बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या
या बंडखोरीचा चांगलाच फटका काँग्रेस पक्षाला बसणार असल्याचे देखील पुण्याच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | rebellion in congress in pune angry balasaheb dabhekar will file nomination form tomorrow

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री; मिळविला ‘या’ जागेवर विजय

Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा

 

Related Posts