IMPIMP

Pune Lonikand Crime | तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure
FIR

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lonikand Crime | सोसायटीमधील पार्किग, टेरेस व इतर सुविधा वापरण्यास नकार देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) बांधकाम व्यावसायिकांसह १५ जणांवर अ‍ॅट्रोसिटी (Atrocity Act) अंतर्गत गुन्हादाखल केला आहे.

याबाबत एका २६ वर्षाच्या तरुणाने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. १४०/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन जाधव (वय ३९, रा. गोकुळ पार्क, वाघोली), गजानन आबनावे, लता गजानन आबनावे, संग्राम आबनावे, सायली आबनावे, डॉ. पाचारणे व इतर ९ (सर्व रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार सिद्धी अपार्टमेंट व बकोरी फाटा येथे १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत घडला. (Pune Lonikand Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे आहे. सचिन जाधव हे सोसायटीचे बिल्डर आहे. दलित लोकांना फ्लॅटची विक्री केली की त्यांचे गरीबीचा फायदा उठवून त्यांना फ्लॅटमधून बाहेर काढणे सोपे जाईल, या उद्देशााने जाणून बुजून दलित लोकांना फ्लॅटची विक्री केलेली असल्याने फियांदी व त्यांचा भाऊ यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

सोसायटीत सर्व जण जमून त्यांची अडवणूक केली. ते राहत असलेल्या सोसायटीमधील कॉमन पार्किंग, टेरेस व मेन्टनन्सचा वापर करण्यास नकार दिला. फिर्यादीच्या भावाला जातीवाक शिवीगाळ करुन काठीने, चप्पलन हाताने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीच्या भावाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) तपास करीत आहेत.

Related Posts