IMPIMP

Pune MahaVitaran News | आकुर्डीमध्ये महावितरणचा आकडेबहाद्दरांना दणका ! तब्बल चौदाशे वीजचोऱ्या उघड; नवीन वीजजोडणीसाठी रिघ

by nagesh
Pune MahaVitaran News | Mahavitran in Akurdi, a blow to the brave! As many as fourteen hundred power thefts revealed; Righ for new electricity connection

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune MahaVitaran News | आकुर्डीमध्ये (Akurdi) चिंचवड स्टेशनजवळील (Chinchwad Railway Station) आनंदनगरमध्ये महावितरणने बुधवारी व गुरुवारी (दि. १५ व १६) धडक मोहीम राबवून सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. महावितरणच्या शाखा अभियंता कृतिका भोसले (Engineer Kritika Bhosale) व १७ सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. यानंतर नवीन घरगुती वीजजोडणी (Power Connection) घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची रिघ लागली आहे. तसेच या परिसरात वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरीयल बंच केबल लावण्यात येणार आहे. (Pune MahaVitaran News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत माहिती अशी की, भोसरी विभागातील (Bhosari Division) चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पाहणी करताना आकडे टाकून वीजचोऱ्या होत असल्याने अतिभारित झालेले रोहीत्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले होते. महावितरणकडून लगेचच कारवाई करीत सर्व आकडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी आनंदनगरमध्ये नवीन रोहीत्र बसविण्यात आले ते दोन दिवसांनी पुन्हा नादुरुस्त झाले. (Pune MahaVitaran News)

 

यानंतर चिंचवड शाखेच्या सहायक अभियंता कृतिका भोसले तसेच आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहायक अभियंता शितल किनकर व अमित पाटील यांच्यासह १५ जनमित्रांनी बुधवारी (दि. १५) सकाळी १० वाजता आनंदनगरमध्ये वीजचोरीविरोधी पुन्हा विशेष मोहीम सुरु केली. त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना वीजचोरीचे परिणाम समजून सांगण्यात आले व अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी (दि. १६) या मोहिमेला सकाळी ११ च्या सुमारास विरोध वाढल्यामुळे पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. या दोन दिवसीय कारवाईमध्ये थेट आकडे टाकून तसेच इतर मार्गाने सुरु असलेल्या सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघड करण्यात आल्या व वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

 

महावितरणकडून आनंदनगर परिसरातील वीजचोरीविरोधी कामगिरीबाबत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सहायक अभियंता कृतिका भोसले यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. या मोहिमेला भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे यांनीही सहकार्य केले. मुख्य अभियंता श्री. पवार यांनी आनंदनगर परिसरात पुन्हा वीजचोऱ्या होऊ नयेत यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्याची सूचना दिली व त्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश दिले आहे. येत्या १५ दिवसांत एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान या मोहिमे दरम्यान महावितरणकडून वीजमीटर (Power Meter) काढून कायमस्वरुपी वीजपुरवठा
खंडित केल्यानंतरही वीजचोरी होत असल्याचे दिसून आले. तसेच काहींनी थेट आकडे टाकून वीजचोरी
केल्याचे आढळून आले. या सर्वांना अधिकृत नवीन घरगुती वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन वीजजोडणी घेण्यासाठी आतापर्यंत थकबाकीपोटी सुमारे ६० हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच नवीन वीजजोडणीची मागणीही वाढली आहे.

 

Web Title :- Pune MahaVitaran News | Mahavitran in Akurdi, a blow to the brave! As many as fourteen hundred power thefts revealed; Righ for new electricity connection

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde On Maratha Reservation | मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Influenza Virus | इन्फल्युएंझा आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून आढावा

 

 

Related Posts