IMPIMP

Pune Metro | पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर ! डिसेंबर अखेर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो धावणार

by nagesh
Pune Metro | regular pune metro to run from sunday pune citizens will experience a pleasant journey at this ticket price

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्पाच्या पिंपरी ते फुगेवाडी या प्राधान्य मार्गावर डिसेंबर 2021 पर्यंत मेट्रो धावणार आहे. 7 किलोमीटर दरम्यान 5 स्टेशन आहेत. पीसीएमसी (PCMC) ते फुगेवाडी (Phugewadi) मार्गावर भोसरी वगळता सर्व मेट्रो स्टेशनचे (Metro station) काम प्रगतीपथावर असल्याची माहिती महामेट्रोचे (Mahametro) कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ (Atul Gadgil) यांनी दिली. प्राधान्य मार्गावर (Pune Metro) पिंपरी-चिंचवड, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी आणि फुगेवाडी अशा पाच स्टेशनचा समावेश आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे मेट्रोचे (Pune Metro) काम पुढील डिसेंबर 2022 म्हणजेच तेरा महिन्यात पूर्ण होणार आहे. डिसेंबर 2022 पर्यत काम पूर्ण होऊन मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार असल्याचा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

(Pune Metro) पुणे मेट्रोचे दोन कॉरिडॉरमध्ये विभागणी करण्यात आली असून यामध्ये 30 स्थानकांचा समावेश आहे. पुणे मेट्रोची एकूण लांबी 33.1 किमी असून पिंपरी चिंचवड ते स्वारगेट (Swargate) या कॉरिडॉर एकची लांबी 17.4 कमी आहे. यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीचा भुयारी मार्ग आहे. तर वानाज (Wanaj) ते रामवाडी (Ramwadi) या कॉरिडॉर दोनची लांबी 15 किमी आहे. आतापर्यंत 65 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांसाठी प्राधान्य विभाग कार्यन्वित करण्यात येणार आहेत. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय (Garware College) हे प्राधान्य विभाग (मार्ग) आहेत.

 

पुणे मेट्रोने प्रकल्प राबवताना सुरुवातीपासून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे.
यामध्ये सौर ऊर्जेचा वापर, पावसाचे पाणी साठवण, वृक्षारोपण, झाडांचे पुन:रोपण इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
याशिवाय मेट्रोच्या मार्गिकेमध्ये येणारे एकही झाड पुणे मेट्रोने तोडलेले नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

संत तुकाराम नगर स्टेशनचे काम पूर्ण झाले असून फुगेवाडी स्टेशनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.
संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज येथील स्थानकांची कामे 50 ते 60 टक्के पूर्ण झाली आहेत.
तर 12 किमी भुयारी मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. इलेक्ट्रिक ओएचईचे (OHE) काम 50 टक्के पूर्ण झाले आहे.
रेंज हिल डेपोचे (Range Hill Depot) काम 83 टक्के तर हिल व्ह्यू पार्क डेपोचे (Hill View Park Depot) 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

 

पीसीएमसी ते निगडी मार्गात त्रुटी
पीसीएमसी ते निगडी या चार किमीच्या मार्गात काही त्रुटी निघाल्या असून त्रुटी दूर करुन या मार्गाचा प्रस्ताव केंद्राकडे पुन्हा पाठवण्यात आला आहे.
या प्रस्तावाला केंद्राकडून लवकरच मान्यता मिळेल.
या मार्गावर तीन स्टेशन असून मान्यता मिळाल्यास पहिल्याच टप्प्यात हे काम होण्याची शक्यता असल्याचे अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Pune Metro | pcmc to phugewadi metro route will start till december end pune metro news

 

हे देखील वाचा :

MLA Gopichand Padalkar | ‘आर्यन खान या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी ठाकरे सरकारचा आटापिटा’ – गोपीचंद पडळकर

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,095 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Parambir Singh | ‘परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे, कुठे पळून गेले त्यांना विचारा’, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

 

Related Posts