IMPIMP

Pune Metro | महामेट्रोकडून 82.5 किलोमीटर लांबीचे नवीन 7 मार्ग प्रस्तावित

by nagesh
Pune Metro | pune citizens will soon experience metro subway journey the work of the tunnels is complete

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Metro | पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) आणि एल ॲण्ड टी कंपनीकडून (L&T Company) तयार करून घेतलेल्या ‘सर्वंकष वाहतूक आराखड्यात (Comprehensive Transport Plan) जवळपास 195.26 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग (Metro Route) प्रस्तावित केले आहेत. पुणे महानगरपालिकेने Pune Municipal Corporation (PMC) 2 आणि पीएमआरडीची एक अशा 3 मेट्रोमार्गांशिवाय (Pune Metro) नव्याने 6 असे एकूण 9 मार्गाचा त्यात समाविष्ठ केला गेला आहे. त्यामध्ये महामेट्रोने (Maha Metro) 82.5 किलोमीटर लांबीचे नवीन 7 मार्ग सूचविलेत. अहवाल तयार करण्यास परवानगी देण्याची विनंती पीएमआरडीए कडून पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

PMRDA ने 7 हजार 200 चौरस किलोमीटर हद्दीचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (CMP) तयार करण्याचे काम ‘एल ॲण्ड टी’ कंपनीला दिलेय. या कंपनीने पहिल्या टप्प्यात 2000 चौरस किलोमीटर लांबीच्या आवारातील वाहतुकीचा आराखडा तयार करून पीएमआरडीला दिलाय. वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी जवळपास 66 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यात मेट्रो (Pune Metro) प्रकल्पांचा देखील समावेश आहे.

 

पुणे महानगरपालिकेने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (Pimpri-Chinchwad To Swargate) आणि वनाज ते रामवाडी (Vanaz To Ramwadi) या 2 मार्गांचे काम हाती घेतलेय. त्याचबरोबर हिंजवडी ते शिवाजीनगर (Hinjewadi To Shivajinagar) दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम PMRDA कडे आहे. सर्वंकष वाहतूक आराखड्यात या मार्गांचे विस्तारीकरणा बरोबरच नवीन 6 मार्ग प्रस्तावित केलेत. हे मार्ग 2 टप्प्यांमध्ये उभारण्याचे नियोजन आहे. 2038 पर्यंत ते पूर्ण करण्याची शिफारस या अहवालामध्ये केली गेली आहे.

 

प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर नंतर 8 मार्गांवर मेट्रो प्रकल्प (Metro Project) उभं करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर कुठल्या मार्गावर हे प्रकल्प राबविता येतील, या बाबत पूर्वसुसाध्यता (प्री फिजीब्लिटी रिपोर्ट – Pre Feasibility Report) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो (Delhi Metro) या कंपनीला काम दिले होते. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 15 कोटी रुपयांची तरतूद केली होती. दरम्यान, प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करावा. त्यानंतर मेट्रोचे जाळे निश्‍चित करावे, असे दिल्ली मेट्रोने म्हटले होते. यानंतर CMP तयार करून घेण्यात आलाय. दरम्यान आता 7 पैकी स्वारगेट ते हडपसर (Swargate To Hadapsar) या मार्गाचे सर्वेक्षण याआधीच झालेय. तर महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला एचसीएमटीआर मार्गावरही (HCMTR Route) मेट्रो प्रकल्प उभं करता येईल का यांची टेस्ट होणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

L&T कंपनीने सुचविलेले मार्ग –

पहिला टप्पा –

निगडी ते कात्रज (Nigdi to Katraj) – 33.63

चांदणी चौक ते वाघोली (Chandni Chowk to Wagholi)- 25.99

हिंजवडी ते शिवाजीनगर (Hinjewadi to Shivajinagar) – 23.33

शिवाजीनगर ते हडपसर (Shivajinagar to Hadapsar) – 11.14

हिंजवडी ते चाकण (Hinjewadi to Chakan )- 30.08

 

दुसरा टप्पा –

सिंहगड रस्ता- वीर बाजी पासलकर ते पुणे कँटोन्मेंट (Sinhagad Road – Veer Baji Pasalkar to Pune Cantonment) – 9.08

वारजे ते स्वारगेट (Warje to Swargate) – 8.87

वाघोली-पवार वस्ती ते हिंजवडी (Wagholi-Pawar Vasti to Hinjewadi) – 35.23

चांदणी चौक ते हिंजवडी (Chandni Chowk to Hinjewadi) – 17.81

नव्याने सुचविण्यात आलेले मार्ग –

वनाज ते चांदणी चौक (vanaz to chandni chowk) – 1.5

रामवाडी ते वाघोली (Ramwadi to Wagholi)- 12

हडपसर ते खराडी (Hadapsar to Kharadi)- 5

स्वारगेट ते हडपसर (Swargate to Hadapsar) – 7

खडकवासला ते स्वारगेट (Khadakwasla to Swargate) – 13

एसएनडीटी ते वारजे (SNDT To Warje) – 5

एचसीएमटीआर (वर्तुळाकार मार्ग) HCMTR (circular path)- 36

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Metro | PMRDA L&T Company Pune Corporation Mahametro seven new routes proposed

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | वर्षभरात 50 पट रिटर्न, ‘या’ पेनी स्टॉकने 1 लाख रुपयांचे केले 50 लाख

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

 

Related Posts