IMPIMP

Pune Metro | रविवारपासून नियमित धावणार ‘पुणे मेट्रो’, ‘या’ तिकीट दरात पुणेकरांना अनुभवता येणार मेट्रोचा सुखद प्रवास

by nagesh
Pune Metro | regular pune metro to run from sunday pune citizens will experience a pleasant journey at this ticket price

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी (दि.6) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवसांपासून लगेच पिंपरी – चिंचवड (Pimpri-Chinchwad) ते फुगेवाडी (Phugewadi) व वनाज (Wanaj) ते गरवारे (Garware) हे दोन मार्ग (Pune Metro) व्यावसायिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहेत. या मार्गावरील कमीत कमी तिकीट 10 रुपये व जास्तीत जास्त 20 असेल. तसेच परतीचे तिकीट पाहिजे असेल तर त्यासाठी 30 रुपये शुल्क द्यावे लागेल. दोन्ही ठिकाणी एकच दर असणार आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे मेट्रो (Pune Metro) सकाळी 7 वाजता सुरु होईल आणि रात्री 9 वाजता थांबेल. प्रत्येक मार्गावर 27 फेऱ्या होणार आहेत. ज्यांचे 100 तासांचे मेट्रो ड्रायव्हिंग पूर्ण झाले आहे, असे प्रशिक्षित चालक दोन्ही मेट्रोला असणार आहेत. त्यांना 8 तासांची ड्युटी आहे. ताशी 80 किमी या वेगाने प्रवाशांना नेण्याची महामेट्रोला (Mahametro) रेल्वे सुरक्षा व दक्षता आयुक्तांची (Railway Safety and Vigilance Commissioner) परवानगी मिळाली आहे. प्रत्येक स्थानकात मेट्रो 20 व गर्दीच्या ठिकाणी 30 सेकंद थांबेल. मेट्रोचे दरवाजे आपोआप बंद होणारे असून दरवाजे बंद झाल्याशिवाय मेट्रो धावणार नाही.

 

प्रवाशांसाठी हेल्पिंग पॉईंट
सुरुवातीच्या काही दिवसांसाठी महामेट्रो प्रत्येक स्थानकात प्रवाशांकरता एक हेल्पिंग पॉईंट करणार आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानकात व डब्यातही एक कर्मचारी असणार आहे. तिकीट कुठे काढायचे, दोन मजली स्थानकात केव्हा, कुठे आणि कसे जायचे याबाबत हे कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बहुतांश सर्व कामे पूर्ण
या दोन्ही मार्गावरील सर्व स्थानकांची तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. स्थानकाला तांत्रिकदृष्ट्या चढण्या – उतरण्यासाठी दोन्ही बाजूंना किमान तीन प्रकारच्या सुविधा असणे आवश्यक आहे. यातील साधा जिना आणि सरकता जिना सर्व स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आला आहे. लिफ्टचे काम काही ठिकाणी झाले असून, काही ठिकाणी सुरु असून ते काम पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

 

विना तिकीट प्रवेश नाही
पहिल्या मजल्यावर तिकीट घर असणार आहे.
तिकीट काढल्यानंतरच दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या जिन्यावर किंवा लिफ्टमध्ये प्रवेश मिळणार आहे.
तिकीट नसेल तर दुसऱ्या मजल्यावर जाता येणार नाही.
याच मजल्यावर खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंचे विक्री स्टॉल असतील.
याच मजल्यावर प्रसाधगृहाची सोय करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दुसऱ्या मजल्यावर प्लॅटफॉर्म
दुसऱ्या मजल्यावर मेट्रोचा प्लॅटफॉर्म (Metro Platform) आहे. सध्या तीनच डब्यांची मेट्रो आहे.
फलाट मात्र सहा डब्यांच्या अंतराचा करण्यात आलेला आहे.
पहिल्या मजल्यावरुन स्थानकाच्या दोन्ही बाजूंना जाता – येता येणे शक्य आहे.
दुसऱ्या मजल्यावर मात्र त्यासाठी मनाई आहे.
स्थानकातील प्रवेशासाठी सध्या तरी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
परंतु काही दिवसांनंतर ते आकारले जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Metro | regular pune metro to run from sunday pune citizens will experience a pleasant journey at this ticket price

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून व्यावसायिकाला 1 लाखांचा ऑनलाईन गंडा

OBC Reservation Maharashtra | SC ने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर ठाकरे सरकारने निवडणुकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय !

SBI Tax Savings Scheme | SBI च्या ‘या’ स्कीममध्ये केवळ रू. 1000 पासून करा गुंतवणूक; टॅक्स सूटसह मिळतील अनेक फायदे

 

Related Posts