IMPIMP

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

by nagesh
Pune NCP | NCP's complaint to Anti Corruption Bureau (ACB) Pune against corruption in various projects in Pune Municipal Corporation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात आज काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode) यांची भेट घेतली. सत्ताधारी भाजपच्या (BJP) कार्यकाळात पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption in PMC) झाला आहे. याबाबत प्रसारमाध्यमे व अनेक सामाजिक संस्था यांनी देखील वारंवार लाचलुचपत विभागाकडे व आयुक्त पुणे महानगरपालिका (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे तक्रार केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

तक्रारीत नमूद केलेले विषय
पुणे महानगरपालिकेच्या 24X7 समान पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व यामध्ये खासगी ठेकेदाराच्या (Contractor) आर्थिक हिताच्या दृष्टीने अनेक ठिकाणी बदल करून सदर योजनेची किंमत आणि अनियमितपणे वाढवण्यात आली आहे.

 

महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर (Baner) व वारजे (Warje) येथे महानगरपालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता अनियमित पद्धतीने काही व्यक्ती व संस्था यांच्या आर्थिक हिताचा विचार करून बाणेर व वारजे येथे एक हजार कोटी रुपये कर्ज घेऊन हॉस्पिटल (Hospital) उभे करण्याची प्रक्रिया करण्याचे प्रयत्न चालू आहे. यामध्ये देखील मोठे आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता आहे. याचीही सखोल चौकशी करण्यात यावी.

 

पुणे शहरातील (Pune City) पुणेकरांच्या हक्काच्या 350 अ‍ॅमिनिटी स्पेस (Amenity Space) या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या (Builder) आर्थिक फायद्यासाठी देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे याची देखील आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘जायका’ प्रकल्पांतर्गत (PMC Jica Project) उभारण्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून आले आहे काही खाजगी ठेकेदार कंपनीच्या विशेष विचार करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येते यामुळे पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

 

16 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समिती (Education Committee)
या बैठकीमध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक व सत्ताधारी यांच्या हितासाठी नियमबाह्य पद्धतीने आरक्षित
असलेल्या प्राथमिक शाळा (Primary School) उभारणीचा प्रस्ताव नियम डावलून मान्य करण्यात
आला या प्रस्तावामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिकाचा पुरेपूर आर्थिक हितसंबंध आहे असे प्रथमदर्शनी दिसून
येते यामुळे या प्रकरणाची आपले विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

 

समाविष्ट गावांचा ड्रेनेज लाईन टाकणे या 393 कोटीचे निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते
या निविदेबाबत अनेक व्यक्ती व संस्था यांनी न्यायालयाने देखील दाद मागितली आहे व तक्रार दाखल केलेली आहे
या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व आर्थिक हितसंबंध असल्यामुळे भ्रष्टाचार झाला
असल्याचे निदर्शनास येते याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या सहा विषयांची निविदा (Tender) किंमत सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे
यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्या संबंधित प्रकरणाची पुणेकरांच्या व महानगरपालिकेच्या आर्थिक हितासाठी ताबडतोब चौकशी करावी
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) शिष्टमंडळाने केली.
यावेळी माजी आमदार जयदेवराव गायकवाड (Former MLA Jaydevrao Gaikwad),
रविंद्र माळवदकर (Ravindra Malwadkar), अंकुश काकडे (Ankush Kakade),
नगरसेवक सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap), बाबुराव चांदेरे (Baburao Chandere),
प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradip Deshmukh) उपस्थित होते.

 

 

Web Title :- Pune NCP | NCP’s complaint to Anti Corruption Bureau (ACB) Pune against corruption in various projects in Pune Municipal Corporation

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांकडून अटक; 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

Natural Mouth Fresheners | श्वासाची दुर्गंधी येतेय, तर या 4 नॅचरल माऊथ फ्रेशनरचा करा वापर

Pune Crime | सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू, चौघांना अटक

 

Related Posts