IMPIMP

Pune News | तलावाच्या मधोमध गेल्यावर लागला दम, महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

by nagesh
Pune News | An employee of the revenue department drowned after going into the middle of the lake

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पोहण्यासाठी तलावाच्या (Swimming) मधोमध गेल्यानंतर दम लागल्याने पाण्यात बुडून एका युवकाचा मृत्यू (Death by Drowning) झाला. मुकुंद त्रिंबकराव चिरके Mukund Trimbakrao Chirke (वय – 35 रा. नसरापूर, मूळ रा. जहागीर मोहा, ता. माजलगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. मुकुंद चिरके हे भोर महसूल विभागात कारकून (Revenue Department Clerk) म्हणून कार्यरत होते. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी सातच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील (Pune News) भोर तालुक्यातील वर्वे खुर्द येथील तलावात घडली.

 

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (District Magistrate Rajendra Kachare), तहसीलदार सचिन पाटील (Tehsildar Sachin Patil), मंडलधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली (Mandaldhikar Srinivas Kandepalli), विद्या गायकवाड, महसूल विभागातील कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी (PSI Shrikant Joshi), सहायक पोलीस उपनिरीक्षक उमेश जगताप (ASI Umesh Jagtap), सरपंच निलेश भोरडे (Sarpanch Nilesh Bhorde), ग्रामसेविका शाहीन इनामदार (Gramsevak Shaheen Inamdar) तसेच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. (Pune News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद चिरके यांना ट्रेकिंगची (Trekking) आवड होती.
ते रोज मित्रांसोबत ट्रेकिंग व पोहण्यासाठी वर्वे या ठिकाणी जात होते. सोमवारी ते मित्रांसोबत वर्वे येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते.
तलावाच्या मध्यभागी गेल्यावर त्यांना दम लागला. त्यावेळी काठावर असलेल्या मित्रांनी त्यांना आवाज दिला.
परंतु मित्र त्यांच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच ते पाण्यात बुडाले.
भोरच्या भोईजल संघाच्या पथकाने त्यांचा पाण्यात शोध सुरू केला. दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

 

Web Title :- Pune News | An employee of the revenue department drowned after going into the middle of the lake

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | ‘… राजकारण सोडावंसं वाटतं’; नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले…&nbsp

CM Eknath Shinde | ‘…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता’, CM एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

UP Gang Rape Case | सामूहिक बलात्कार प्रकरण ! माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतून अटक

Related Posts