IMPIMP

CM Eknath Shinde | ‘…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता’, CM एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde will announce public holiday on dahi handi 19 august

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर काही तासातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने (central Leadership) फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात (Cabinet) सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्यातील नवीन सरकार स्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता असे म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्यातील धनगर समाजाच्या (Dhangar community) वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात धनगर बांधवांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. धनगर समाजासाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत देखील लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मलाही विश्वास नव्हता की मी राज्याचा मुख्यमंत्री होईल.
मात्र सर्व काही घडत गेलं. तुम्ही सर्व टीव्हीवर पाहिलं असेल. तुम्हाला पण धाकधूक लागली असेल.
आम्ही सुरुवातीला तीन – चार दिवस झोपलोच नाही.
तीन दिवस सतत दिवस – रात्र हा एकनाथ शिंदे एक मिनिट पण झोपला नव्हता कारण खूप टेन्शन होतं, असं त्यांनी सांगितलं.
तसेच डोक्यात त्यावेळी बऱ्याच गोष्टी सुरु होत्या. आम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतला होता.
नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता, असेही शिंदे यांनी सांगितले.

 

शिंदे पुढे म्हणाले, परमेश्वर आमच्या पाठीशी होता. बघता बघता सगळे लोक एक एक करत वाढत गेले.
एक दोन नाहीतर 50 लोक एकत्र आले, असेही शिंदे यांनी सांगितले.
धनगर समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, तसेच ज्या 3 धनगर समाजबांधवांनी आरक्षण (Reservation) आंदोलनात आत्मदहन केले.
त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 लाख रुपये मदत केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde says we had taken big decision over political situation otherwise our program will be done

 

हे देखील वाचा :

UP Gang Rape Case | सामूहिक बलात्कार प्रकरण ! माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतून अटक

Maharashtra Political Crisis | शिवसेनेला मोठा धक्का ! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात ?, 25 पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते देखील

Rahul Deshpande | चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले – राहुल देशपांडे

 

Related Posts