IMPIMP

Pune News | क्रांनीच सोलर व रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या रक्तदान शिबीरात 41 जणांचे रक्तदान

by nagesh
Pune News | Blood donation of 41 people at Kranich Solar and Rotary Club of Pune University’s blood donation camp

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | क्रांनीच सोलर (krannich solar pvt. ltd) व रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या (Rotary Club of Pune University) संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.20) रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले होते. भारती हॉस्पिटल ब्लड बँकेच्या (Bharati Hospital Blood Bank) सहकार्याने क्रांनीच सोलर कंपनीच्या आवारात रक्तदान शिबिर (Pune News) घेण्यात आले. या रक्तदान शिबीरात 41 जणांनी रक्तदान केले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

क्रांनीच सोलर कंपनीच्या आवारात, या वर्षी दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले.
कंपनीकडून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 41 रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या.
यावेळी क्रांनीच सोलर कंपनीचे प्रमुख राजेश तोमर (Rajesh Tomar), संदीप बनोडिया (Sandeep Banodia), रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटीचे पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) व राकेश ठाकूर (Rakesh Thakur), भारती हॉस्पिटल ब्लड बँकचे आशिफ शेख तसेच भारती ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
शिबिराचे नियोजन रक्षणदा लांडे, पृथ्वीराज पाटील व आशिफ शेख यांनी (Pune News) केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एका जर्मन कंपनीच्या (German company) कर्मचाऱ्यांचे असे दोनदा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून, तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. याचे अनुकरण अजून मोठ्या कंपन्यांनी करावे, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.

 

Web Title: Pune News | Blood donation of 41 people at Kranich Solar and Rotary Club of Pune University’s blood donation campyt

 

हे देखील वाचा :

Narayan Rane on CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिसला 3 वेळा ED कडून समन्स; अभिनेत्रीनं चौथ्यावेळी दिलं स्पष्टीकरण

 

Related Posts