IMPIMP

Pune News | सहकारनगरमध्ये सजली हिंदी-मराठी गाण्यांची मैफल; आधार सेवा केंद्राकडून आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम

by nagesh
Pune News | Concert of beautiful Hindi-Marathi songs in Sahakarnagar; The event was organized by Aadhar Seva Kendra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | हिंदी व मराठी सुमधुर चित्रपट गीतांच्या आस्वाद घेत सहकारनगर (Sahakarnagar) परिसरातील तुळशीबागवाले कॉलनी (tulshibagwale colony) मैदानावर सुमारे अडीच हजार रसिक प्रेक्षकांनी रविवारी सायंकाळी ‘सांस्कृतिक दिवाळी’चा आनंद लुटला. आधार सेवा केंद्राचे (Aadhaar Seva Kendra) अध्यक्ष हेमंत बागुल (Hemant Bagul) यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रख्यात पार्श्वगायक जितेंद्र भुरुक (jitendra bhuruk singer) व सहकार्‍यांनी हिंदी व मराठी गीतांची अविट मैफल सादर केली. या वेळी अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे ‘वन्स मोअर’ही (Pune News) दिला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या वेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Muralidhar Mohol), पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul)
आवर्जून उपस्थित होते.
‘सहकारनगरमधील या सांस्कृतिक कार्यक्रमास सहभागी होता आले याचा आनंद झाला असून, गेले सुमारे 20 महिने करोनामुळे आलेली बंधने आता परिस्थिती सुधारल्यामुळे दूर होत आहेत.
त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने असा आनंद घेत आहेत याचे समाधान वाटते’, असे ते म्हणाले.

 

याप्रसंगी पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल म्हणाले की, ‘संगीत हा सगळ्यांना एकत्र गुंफणारा धागा आहे.
तसेच सध्याच्या मानसिक तणावाच्या काळात संगीतामुळेच मनाला आनंद मिळतो.
या कार्यक्रास अडीच हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहिले यावरून अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची किती मोठी गरज आहे याची प्रचिती येते’ असे ते म्हणाले.

 

 

प्रास्ताविक करताना हेमंत बागुल यांनी पार्श्वगायक जितेंद्र भुरुक यांचे कौतुक करून गाण्यांचे पाच हजारांहून अधिक कार्यक्रम जितेंद्र भुरुक यांनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
तसेच असे कार्यक्रम आयोजित करून सुमारे 65 लाख रुपये त्यांनी विविध सामाजिक संस्थांना मिळवून दिले याबद्दलही त्यांनी जितेंद्र भुरुक यांचे कौतुक (Pune News) केले.

 

याप्रसंगी पुण्याचे वैभव असणारे व सहकारनगर परिसराचे रहिवासी ज्येष्ठ व्हायोलिनवादक कै. प्रभाकर जोग यांना व्हायोलिनची धुन वाजवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांचे नातू गायक अमेय जोग हे याप्रसंगी उपस्थित होते.
तसेच प्रख्यात गायक राजेंद्र बर्वे व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

पार्श्वगायक जितेंद्र भुरुक यांना शैलेश देशपांडे (व्हायोलिन), रशिद शेख (की-बोर्ड), मुकेश देढिया (गिटार), विजय मूर्ती (बेस गिटार),
अनिल करमरकर (सॅक्सोफोन), अभिषेक भुरुक (ड्रम), आनंद घोगरे (मशिन), दिनेश पांडे (साइड रिदम), किरण एकबोटे (ढोलक),
रोहित साने (तबला) यांनी साथ दिली.
जितेंद्र भुरुक यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले.
गायनाला साथ राजेश्वरी पवार, अश्विनी गुरपे आणि साउंड गौतमचे बाळा पवार यांनी केली.

 

या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन संजय पोमण यांनी केले. आभार प्रदर्शन घनश्याम सावंत यांनी केले.
सर्व रसिकांसाठी चहा व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
याप्रसंगी सौ. जयश्री बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, विलास रत्नपारखे,
अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित (Pune News) होते.

 

Web Title : Pune News | Concert of beautiful Hindi-Marathi songs in Sahakarnagar; The event was organized by Aadhar Seva Kendra

 

हे देखील वाचा :

NCRB Data | धक्कादायक ! ‘एनसीआरबी’च्या अहवालातून समोर आले तथ्य, 2020 मध्ये शेतकर्‍यांपेक्षा जास्त व्यापार्‍यांनी केल्या आत्महत्या

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! ‘या योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा दरमाह 5 हजार रुपये; जाणून घ्या

Satara News | खा. उदयनराजे पोहोचले श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या भेटीला; दीड तास चर्चा

 

Related Posts