IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! ‘या योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा दरमाह 5 हजार रुपये; जाणून घ्या

by nagesh
Post Office Scheme | these five schemes of post office which get the highest return double the money in a few years

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Post Office Scheme | पोस्ट ऑफिसने (Post Office) ग्राहकांसाठी एक लाभदायक योजना आणली आहे. यामुळे ग्राहकांना पैसे गुंतवणूक करण्यासाठी या योजनेचा उपयोग होऊ शकतो. मासिक उत्पन्न योजना (Post Office Scheme) असं या योजनेचं नाव आहे. प्रति महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असल्यास पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) एक चांगली योजना आहे. हा एक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यात एकरकमी गुंतवणूक करावी लागणार आहे. यात पैसे 100 टक्के सुरक्षित आहेत. या योजनेत विवाहितांना दुप्पट लाभ मिळतो. तसेच, पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर एकल आणि संयुक्त खाते (Single And Joint Account) सुरू करण्याची सोय आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एकल खातेदार गुंतवणूकदारांना किमान 2475 रुपये अथवा 29,700 रुपये दर महिना वार्षिक उत्पन्न गॅरंटी मिळते. तसेच संयुक्त खात्यात हा नफा दुप्पट होतो. तुम्ही POMIS खात्यात एकल खाते उघडल्यास, साडे चार लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील. त्याचृवेळी, संयुक्त खात्याच्या माध्यमातून अधिकाधिक 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यात 6 टक्के वार्षिक व्याजाने संपूर्ण वर्षभरात मिळणारी रक्कम 12 महिन्यांत विभागली जाते. दर महिन्याची रक्कम ही तुमचे मासिक उत्पन्न असते. योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे, पण, आगामी गुंतवणूकी अंतर्गत ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकणार आहे. (Post Office Scheme)

 किती आहे व्याज?

– पोस्ट ऑफिस (Post Office) मासिक उत्पन्न योजना (POMIS) 6.6 टक्के वार्षिक व्याज देते.

– उघडल्याच्या तारखेपासून १ महिना पूर्ण झाल्यावर आणि मुदतपूर्ती होईपर्यंत व्याज देय असेल.

– प्रति महिना देय असलेल्या व्याजावर खातेदाराने दावा केला नसेल, तर अशा व्याजातून कोणतेही अतिरिक्त व्याज जमा होणार नाही. >

– पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात ऑटो क्रेडिट अथवा ईसीएसद्वारे व्याज काढले जाऊ शकते.

– ठेवीदाराला मिळणारे व्याज करपात्र आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

MIS खाते असं सुरू करा –

पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे MIS खाते उघडू शकता. POMIS फॉर्म भरताना, तुम्हाला ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, 2 पासपोर्ट फोटो आवश्यक असतील. फॉर्म भरताना, तुम्हाला साक्षीदाराचीही आवश्यकता असणार आहे. फॉर्मसह खाते उघडण्यासाठी ठरवलेल्या रकमेसाठी रोख अथवा चेक जमा करा. (Post Office Scheme)

प्रतिवर्षी 60 हजार रुपये मिळणार –

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये एका खात्याद्वारे किमान 4.5 लाख रुपये जमा करू शकता येते. वार्षिक 6.6 टक्के व्याजदरानुसार या रकमेवर एकूण 29,700 रुपये व्याज मिळेल. तर या योजनेत जॉईंट अकाऊंटच्या माध्यमातून अधिकाधिक 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. व्याजदरानुसार या रकमेवर एकूण 59,400 रुपये व्याज मिळणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

प्री-मॅच्युअर खाते बंद करण्याचे नियम काय?

या योजनेनुसार ठेवीच्या तारखेपासून 1 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव काढता येत नाही. खाते 1 वर्षापूर्वी आणि खाते उघडण्याच्या 3 वर्षापूर्वी बंद केले असल्यास, मूळ रकमेच्या 2 टक्के एवढी रक्कम कापली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल. खाते उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेच्या 1 टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाणार आहे.

 

Web Title: Post Office Scheme | what is post office monthly income scheme how to invest know more

 

 

हे देखील वाचा :

Satara News | खा. उदयनराजे पोहोचले श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या भेटीला; दीड तास चर्चा

Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून आरोपींनी मुलीला घराबाहेर काढून केले विकृत कृत्य

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

EPFO | आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन ! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत असा करा ऑनलाइन अर्ज

 

Related Posts