IMPIMP

NCRB Data | धक्कादायक ! ‘एनसीआरबी’च्या अहवालातून समोर आले तथ्य, 2020 मध्ये शेतकर्‍यांपेक्षा जास्त व्यापार्‍यांनी केल्या आत्महत्या

by nagesh
NCRB Data | ncrb data shows more suicides among businessmen than farmers in 2020

नवी दिल्ली : वृत्तसंस्था NCRB Data | अनेक वर्षांपासून सातत्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हे पाऊल उचलत आहेत. परंतु राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचे (NCRB Data) आकडे सांगतात की, देशात मागील वर्षी व्यापार्‍यांनी आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये 2019 च्या तुलनेत 50 टक्के वाढ दिसून आली आहे. सर्व श्रेणींमध्ये हा आकडा जास्त आहे (In 2020, more traders committed suicide : NCRB report).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

व्यापार्‍यांचे मोठे नुकसान

मागील वर्षी देशात शेतकर्‍यांपेक्षा जास्त व्यापार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोनामुळे 2020 मध्ये अनेक व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान झाल्याने तसेच कुठूनही मदतीचा हात नसल्याने अनेकांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.

 

 

कोरोनाचा झाला खुप वाईट परिणाम

फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायजेसचे महासचिव अनिल भारद्वाज (Anil Bhardwaj, General Secretary, Federation of Indian Micro, Small and Medium Enterprises) यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, 2020 मध्ये कोरोनामुळे छोट्या व्यापार्‍यांवर खुप वाईट परिणाम झाला.

 

 

 व्यापारी सुद्धा अती तणावात

त्यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत असे समजले जात होते की, पिक वाया गेल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी जास्त आत्महत्या करतात. परंतु या अहवालावरून समजते की, व्यापारी सुद्धा अती तणावात आहेत.

कोरोनाने व्यापार्‍यांची समस्या आणखी बिकट बनवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोरोना काळात व्यापार पूर्णपणे ठप्प झाला. लॉकडाऊनने स्थिती आणखी बिघडवली.

 

 

2020 मध्ये जास्त आत्महत्या

NCRB Data च्या आकड्यांनुसार, 2019 च्या तुलनेत व्यापार्‍यांनी 2020 मध्ये शेतकर्‍यांपेक्षा सुद्धा जास्त आत्महत्या केल्या. 2020 मध्ये 10 हजार 677 शेतकर्‍यांच्या तुलनेत 11 हजार 716 व्यापार्‍यांनी आत्महत्या केली.

यामध्ये 4356 ट्रेडर होते तर 4226 वेंडर्स होते. 2020 मध्ये कोरोनामुळे आर्थिक संकटाच्या एक वर्षाच्या दरम्यान व्यापार्‍यांमध्ये आत्महत्यांमध्ये 50 टक्के वाढ दिसून आली.

 

 

2020 मध्ये 4,356 व्यापार्‍यांनी केली आत्महत्या

2019च्या तुलनेत 2020 मध्ये व्यापार्‍यांच्या आत्महत्यांमध्ये 29 टक्के वाढ झाली.

व्यापार्‍यांच्या आत्महत्या 49.9 टक्के वाढीसह 2019 मध्ये 2,906 ने वाढून 2020 मध्ये 4,356 झाल्या.

 

 

पहिल्यांदाच व्यापार्‍यांवर असे संकट

देशात एकुण आत्महत्यांचा आकडा 10 टक्केने वाढून 1 लाख 53 हजार 52 झाला.
हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
शेतकर्‍यांच्या तुलनेत व्यापार्‍यांमध्ये असे मृत्यू नेहमीच कमी दिसून येतात,
परंतु अगोदरच आर्थिक अडचणीने हैराण झालेले व्यापारी कोरोना महामारीनंतर निर्माण झालेलेया आर्थिक संकटाने तणावात आहेत.

 

Web Title: NCRB Data | ncrb data shows more suicides among businessmen than farmers in 2020

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! ‘या योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा दरमाह 5 हजार रुपये; जाणून घ्या

Satara News | खा. उदयनराजे पोहोचले श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या भेटीला; दीड तास चर्चा

Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून आरोपींनी मुलीला घराबाहेर काढून केले विकृत कृत्य

 

Related Posts