IMPIMP

Pune News | सन्मान स्त्री शक्तीचा ! कर्तृत्ववान महिलांचा वडगावशेरी भाजपकडून सन्मान

नवरात्री निमित्त भाजपच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

by nagesh
Pune News | Honor female power! Wadgaon Sheri BJP honors capable women

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आदिशक्तीचा जागर केला जात आहे. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत सन्मान कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा हे अभियान भाजपकडून (BJP) राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सलग नऊ दिवस विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वडगाव शेरी प्रभागातील कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान केला जाणार (Pune News) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सन्मान कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा या अभियानाच्या अंतर्गत सफाई कामगार, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, घरेलू कामगार, डॉक्टर, वकिल,
शिक्षिका, भजनी मंडळ, छोटे व्यवसायिक, भाजी विक्रेते, उच्च शिक्षित अशा विविध क्षैत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत आज चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandan Nagar Police Station) कार्यरत महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक (corporator yogesh mulik), नगरसेविका सुनीता गलांडे (corporator sunita galande), नगरसेवक संदीप जऱ्हाड
(corporator sandeep jarhad, नगरसेविका शितल शिंदे (corporator sheetal shinde), ज्ञानेश्वर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव (Senior Police Inspector Sunil Jadhav),
शशी बोडके, राजू घुले, महेंद्र चांधेरे, सागर काळे, विपुल राऊत, योगेश शिंदे, विष्णू चांधारे, मुकूंद गलांडे, संतोष घोलप, लक्ष्मण तिप्पे, गणेश वाईकर,विष्णू सुरणर, व महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते.

उपक्रमा बाबत सांगताना नगरसेवक योगेश मुळीक म्हणाले की, प्रभागातील अनेक महिला स्वकर्तृत्वाने मोठया पदावर गेल्या आहेत.
अनेक कुटुबांमध्ये कर्त्या महिला आहेत.
एका बाजूला घर आणि दुसरीकडे यशस्वीपणे व्यवसाय संभाळत आहेत.
अशा ४०० कर्तुत्वान महिलांचा सन्मान नवरात्री निमित्त केला जाणार (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | Honor female power! Wadgaon Sheri BJP honors capable women

 

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकाराने विचारला प्रश्न, यावर राकेश झुनझुनवाला यांनी दिले हे उत्तर (व्हिडीओ)

Pune Court | अ‍ॅड. शाम गोपाल मुंदडा ‘त्या’ गुन्ह्यातून दोषमुक्त

Weight Loss Tips | अशाप्रकारे सेवन केले ओटमील, तर कमी होण्याऐवजी वाढू लागेल वजन!

 

Related Posts