IMPIMP

Pune News | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा सभागृह नेते गणेश बिडकरांवर हल्लाबोल, प्रशांत जगताप म्हणाले – ‘आरोप करताना आपले हात धुतलेले आहेत का पहावं; 100 कोटींच्या प्रॉपर्टीवरून देखील…’ (व्हिडीओ)

by nagesh
Pune News | NCP city president Ganesh Bidkar's attack on House leader, Bidkar, Prashant Jagtap said - 'We should see if our hands are washed while making allegations; Even from a property worth Rs 100 crore ... '(video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | ज्यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना मोक्का लावला आहे. ज्या पक्षाचे गृहमंत्री राहिलेले नेते फरार आहेत, आणि त्याचा सत्संग प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) करत असल्याचे भाष्य सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) आणि प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी दोन प्रश्न विचारत याचा खुलासा पुणे भाजप आणि सभागृनेते गणेश बिडकर यांनी करावा असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत (Pune News) होते.

https://fb.watch/8XIbYdiDls/

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

 

पुण्यातील एका ज्येष्ठ नेत्याने आणि माजी मंत्र्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (pune anti corruption bureau) गणेश बिडकर यांच्या संपत्तीची चौकशी करुन गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केली होती. त्याबाबत त्यांची चौकशी सुरु होती.
त्यासंदर्भात पुणे भाजपने (Pune BJP) आणि गणेश बिडकर यांनी खुलासा करावा की चौकशी संदर्भात त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने अर्ज केला होता की इतर पक्षाने अर्ज केला होता.
असे आवाहन प्रशांत जगताप यांनी (Pune News) केले.

तसेच त्यांचेच तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिडकर यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
आणि ज्या अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) ते आरोप करत आहेत त्यांच्याच कार्यकाळात त्यांची चौकशी पूर्ण झाली.
त्यामुळे खुणशीपाने कोण काम करतं हे गणेश बिडकर यांनी आंतरमनाने विचार करुन खुलासा करावा, असेही प्रशांत जगताप म्हणाले.

 

100 कोटींची संपत्ती अन्…

 

गणेश बिडकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलल्यानंतर आज त्यांच्याच पक्षातील एका कार्यकर्त्याने बिडकर यांच्या 100 कोटी रुपयांच्या सपत्तीची
चौकशी करण्याचं नवीन पत्र एसीबीला (ACB) दिलं आहे. त्याची फाईल आपल्याकडे दिल्याची माहिती प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितले.
याबाबत देखील गणेश बिडकर यांनी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.
दुसऱ्यावर आरोप करताना आपले हात धुतलेले आहेत का हे पहावे असा टोला त्यांनी लगावला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title Pune News | NCP city president Ganesh Bidkar’s attack on House leader, Bidkar, Prashant Jagtap said – ‘We should see if our hands are washed while making allegations; Even from a property worth Rs 100 crore … ‘(video)

 

हे देखील वाचा :

Gangster Chhota Rajan | 38 वर्षांपूर्वी 2 पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर छोटा राजन ‘निर्दोष’

Bhandara Crime | आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने शेजाऱ्याचा चिरला गळा; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

Pune News | महापौर मुरलीधर मोहोळ यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना इशारा, म्हणाले – ‘प्रशांत जगताप वागणं बदला, अन्यथा शिक्षा भोगावी लागेल’

 

Related Posts