IMPIMP

Pune News | 6 वर्षीय चिमुकलीच्या पोटात अडकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली बाहेर; पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरांना यश

by nagesh
Pune Crime News | Suicide of a young woman pursuing medical education by jumping from the building of Sassoon Hospital MBBS Student

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुण्यातील (Pune News) एका 6 वर्षीय चिमुकलीच्या पोटात अडकलेली केसांना लावण्याची पिन (क्लिप) शस्त्रक्रियेद्वारे (By Surgery) बाहेर काढण्यात ससूनमधील डॉक्टरांना (Pune Sassoon Doctor) यश आलं आहे. स्वाती नेटारे (Swati Netare) (वय 6 वर्ष रा. पाषाण, पुणे) असं त्या चिमुकलीचं नाव आहे. ससून रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. पद्मसेन रनबागळे (Dr. Padmasena Ranbagale) यांनी गुरुवारी सकाळी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली. यामुळे आता स्वाती अडचणीतून मुक्त झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

स्वातीने दातात अन्नाचे काही कण अडकल्याने ते बाहेर काढण्यासाठी 19 मे रोजी या पिनच्या साहाय्याने प्रयत्न करत असताना ती चुकीने पोटात गेली. सुरवातीला तिच्या पालकांना काही डॉक्टरांनी सांगितले होते की ती आपोआप बाहेर पडेल, परंतु, तसे काही झाले नाही. त्यानंतर, काही खासगी रुग्णालयांनी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी नकार दिला. एका रुग्णालयाने 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च होईल असं सांगितलं होतं. (Pune News)

 

दरम्यान, एका वृत्ताच्या सहाय्याने वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले (Dr. Ajay Chandanwale) यांनी स्वातीच्या कुटुंबियांची चौकशी करून त्यांना ससूनमध्ये शस्त्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले. यासाठी ‘उडान फाउंडेशन’ च्या भाग्यश्री ठाकूर (Bhagyashree Thakur) यांनी या मुलीला त्यांच्या वाहनाने तिच्या राहत्या घरातून ससून हॉस्पिटलमध्ये बुधवारी सायंकाळी घेऊन जाऊन ऍडमिट केले. त्यानंतर आज (गुरूवारी) सकाळी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

 

डॉ. पद्मसेन रनबागळे यांनी स्वातीच्या पोटात अडकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढले आहे. शस्त्रक्रियेनंतर आता स्वातीची तब्येत ठीक असून लवकरच तिला डिचार्ज देण्यात येणार आहे. यानंतर नेटारे कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune News | pin stuck in the abdomen was surgically removed by pune sasoon hospital doctors

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार ! नोकरीसाठी पैसे घेऊन घातला 10 लाखांना गंडा

 

Related Posts