IMPIMP

Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पाठीमागून सातत्याने हॉर्न वाजविणार्‍यांना हाताने पुढे जा असे सांगितल्याच्या रागातून दोघांनी एका मोटारसायकलवरील तरुणाला हेल्मेटने मारहाण (Helmet) करुन त्याचे नाक फ्रॅक्चर (Nose Fracture) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या प्रकरणी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील एका ३७ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी हे एका कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझर (Security Supervisor) आहेत. ते हडपसर मुंढवा रोडने (Hadapsar Mundhwa Road) ३० मे रोजी रात्री दहा वाजता मोटारसायकलवरुन जात होते.
त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन येणारे दोघे जण सातत्याने हॉर्न वाजवत चालले होते.
म्हणून त्यांना फिर्यादी यांनी हाताने पुढे जा असे सांगितले. तेव्हा ते दोघे चालू गाडीवरुन शिवीगाळ करु लागले.
तेव्हा मुंढवा पुलावर (Mundhwa Bridge) त्यांनी गाडी थांबविली.
ते दोघे त्यांच्याजवळ येऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करु लागले.
त्यांच्या हातातील हेल्मेट घेऊन त्याने त्यांच्या तोंडावर मारहाण केली.
त्यांच्या नाकातून रक्त येऊन ते खाली पडले ते पाहून दोघे पळून गेले.
त्यांना नोबेल हॉस्पिटल (Noble Hospital Pune) येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या तोंडाचे सिटी स्कॅन (CT Scan) केले असता डॉक्टरांनी त्यांचे नाकाचे हाड फ्रॅक्चर (Nasal Bone Fractures) झाले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Told to go ahead hit the young man with a helmet and fractured his nose Incident on Hadapsar Mundhwa Road

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार ! नोकरीसाठी पैसे घेऊन घातला 10 लाखांना गंडा

Pune Crime | 17 वर्षाच्या मुलीचा वडिलच पैसे घेऊन लावून देत होता विवाह; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार

Pune Police News | ‘पुणे तिथे काय उणे ! ‘साहेब, मासे आणायला गावी जायचंय, सुट्टी द्या’; ‘खडक’ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याचं ‘कडक’ पत्र व्हायरल

 

Related Posts