IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार ! नोकरीसाठी पैसे घेऊन घातला 10 लाखांना गंडा

by nagesh
Pune Crime | Abortion induced by rape by luring marriage; A case has been registered against the youth under the Atrocities Act along with rape

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मैत्री करुन प्रेमसंबंध (Love Affair) करुन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला सरकारी नोकरीसाठी (Money For Government Job) पैसे घेतले. त्यानंतर हे पैसे परत मागितल्यावर तुझ्या होणार्‍या नवर्‍याला सांगून लग्न मोडण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी एका तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी युवराज आनंदराव पाटील Yuvraj Anandrao Patil (वय २७, रा. रेंदाळ, हातकणंगले – Hatkanangle, जि. कोल्हापूर – Kolhapur) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार गोवा (Goa), महाबळेश्वर (mahabaleshwar), हिंजवडी येथे २०१८ ते २०२१ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मुळची शिरोळ (Shirol) येथील राहणारी असून युवराज पाटील हा हातकणंगले येथील राहणारा आहे.
त्यांची पुण्यात ओळख होऊन मैत्री झाली. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.
युवराज याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून गोवा येथे नेऊन तेथे लॉजवर (Lodge In Goa) त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध निर्माण केले.
तसेच महाबळेश्वर, हिंजवडी येथील फ्लॅटवर वारंवार त्यांच्याशी शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. या कालावधीत फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन कंपनीमध्ये प्राब्लेम निर्माण झाला आहे. सरकारी नोकरीसाठी पैसे पाहिजे, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख ६५ हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केल्यावर त्यांना त्यातील फक्त १ लाख ५९ हजार रुपये परत केले. उरलेल्या पैशांची मागणी केल्यावर तुझ्या भावी नवर्‍याला आपल्याबाबत सांगेन व जमलेले लग्न मोडेल, अशी धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी गावाला निघून गेल्या असून त्यांनी तेथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेथून हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Rape by showing the lure of marriage Taking money of Rs 10 lakh for the job cheating fraud case

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 17 वर्षाच्या मुलीचा वडिलच पैसे घेऊन लावून देत होता विवाह; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार

Pune Police News | ‘पुणे तिथे काय उणे ! ‘साहेब, मासे आणायला गावी जायचंय, सुट्टी द्या’; ‘खडक’ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याचं ‘कडक’ पत्र व्हायरल

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts