IMPIMP

Pune News | ग्रामीण पोलिसांकडून सोमेश्वरनगर, पणदरे, मोरगाव, सुपे, वडगाव निंबाळकर येथे आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by nagesh
Pune News | Spontaneous response from rural police to the blood donation camp organized at Someshwarnagar, Pandare, Morgaon, Supe, Wadgaon Nimbalkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास (Pune News) वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गावातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांच्या संकल्पनेतून बुधवार (22 सप्टेंबर) रोजी हे महारक्तदान शिबिर (Blood donation camp) राबवण्यात आलं होतं. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काल बुधवारी सोमेश्वरनगर, पणदरे, मोरगाव, सुपे, वडगाव निंबाळकर या 5 ठिकाणी महारक्तदान शिबिराचं (Blood donation camp) आयोजन करण्यात आलं होतं.
या शिबिरास अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. यात एकूण 1317 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. तसेच, पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ, पत्रकार, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील, होमगार्ड, महिला दक्षता समिती, नागरिकांनी रक्तदान करून शिबिरास प्रतिसाद दिला. तर, अक्षय ब्लड बँक पुणे (Akshay Blood Bank Pune) यांच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि हेल्मेट देण्यात आले आहे.

बारामती पंचायत समिती सभापती निता फरांदे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती शहर पोलिस ठाण्याचे पीआय नामदेव शिंदे यांनी रक्तदान शिबिरास (Blood donation camp) भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, या शिबिराच्या शुभारंभास बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,
प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तहसिलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एपीआय सोमनाथ लांडे यांनी केले.
तर, सूत्रसंचालन पत्रकार चिंतामणी क्षीरसागर तसेच, आभार सहाय्यक फौजदार शरद वेताळ यांनी मानले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एकूण रक्तदान किती झाले –

वडगाव निंबाळकर – 362

सोमेश्वरनगर दुरक्षेत्र – 283

सुपा दुरक्षेत्र – 260

पणदरे दुरक्षेत्र – 258

मोरगाव पोलीस मदत केंद्र – 154

एकूण – 1317

 

Web Title : Pune News | Spontaneous response from rural police to the blood donation camp organized at Someshwarnagar, Pandare, Morgaon, Supe, Wadgaon Nimbalkar

 

हे देखील वाचा :

PMPML | एमएनजीएल आणि पीएमपी अधिकाऱ्यामध्ये 52 कोटींच्या थकबाकी बाबत उद्या बैठक

Mumbai Crime | मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; प्रचंड खळबळ

OBC Reservation | OBC चा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; अखेर सुधारीत अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

 

Related Posts