IMPIMP

PMPML | एमएनजीएल आणि पीएमपी अधिकाऱ्यामध्ये 52 कोटींच्या थकबाकी बाबत उद्या बैठक

by nagesh
Pune PMPML Bus News | PMPML bus service on 2 new routes Kothrud Stand to Hinjewadi Maan Phase-3 and Sangvi Gaon to Symbiosis Hospital Lavale, Know Route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMPML | पीएमपीएमएल (PMPML) ने सीएनजी गॅस (CNG Gas) चे 52 कोटी रुपये थकवल्याने एमएनजीएल (MNGL) कंपनीकडून पीएमपीच्या शिवाजीनगर (Shivajinagar) आणि कात्रज (Katraj Depo) डेपोतील पंपांचा गॅस पुरवठा बंद केला. ती थकबाकी देण्यासंदर्भात उद्या एमएनजीएल आणि पीएमपीचे अधिकारी यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागील पावणे दोन वर्षात करोनामुळे आर्थिक फटका अनेक भागाला बसला आहे.तसाच पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक म्हणून ओळख असलेल्या
पीएमपीएमएल ला सर्वाधिक बसला असून 600 कोटी रुपयांवर संचित तोटा झाला आहे. तर दुसर्‍या बाजूला अनलॉकनंतर पीएमपीची वाहतूक
पूर्वपदावर येत असताना. एमएनजीएल ने 52 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी शिवाजीनगर आणि कात्रज या दोन डेपोतील सीएनजी पुरवठा बंद केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर एमएनजीएल आणि पीएमपीचे अधिकारी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठक उद्या घेतली जाईल. तसेच 30 तारखेपर्यंत काही रक्कम दिली जाईल, मात्र तूर्तास तरी गॅस पुरवठा सुरू करावा, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) यांनी एमएनजीएलच्या संचालकांना दिले आहेत.अशी माहिती संचालक राजेश पांडे (mngl director rajesh pande) यांनी दिली. त्यामुळे आता उद्या होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Web Title : PMPML | MNGL and PMP officials to meet tomorrow regarding Rs 52 crore arrears

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; प्रचंड खळबळ

OBC Reservation | OBC चा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; अखेर सुधारीत अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येणार पैसे?

 

Related Posts