IMPIMP

Pune News | बंदी असताना वरंधा घाटातून धोकादायक प्रवास; तिघांसह कार नीरा देवघर धरणात कोसळली

by sachinsitapure
Pune News | traveling through the varandghat ghat during the ban car crashed into the neera deoghar dam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | पुणे घाटमाथ्यावर पावसाचा जोर (Rain) अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची सतत रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटना देखील तितक्याच घडत आहेत. यामुळे पुणे (Pune) आणि रायगड प्रशासनाने (Raigad Administration) वरंधा घाट (Varandha Ghat) रस्ता बंद केला आहे. वरंधा घाट बंद केल्यानंतर ताम्हिनी घाटाचा (Tamhini Ghat) पर्याय वाहन धारकांना आहे. मात्र प्रशासनाचा आदेश धुडकाऊन काही जण धोकादायक पद्धतीने वरंधा घाटातून प्रवास (Travel) करत दिसत आहे. यामुळे मोठा अपघात (Accident) झाल्याचे समोर आले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुण्याहून वरंधा घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर कार (Car) नीरा देवघर धरणाच्या (Neera Deoghar Dam) पाण्यात कोसळली. ही घटना शनिवारी घडली. या कारमध्ये तिघे होते. ही घटना समजताच स्थानिक रेस्क्यू पथक (Rescue Squad) दाखल झाले. या कारमधील तिघांसंदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. रेस्क्यू पथकाच्या ऑपरेशननंतर यासंदर्भातील अधिक माहिती समोर येईल. पण, वरंधघाट मार्ग बंद असताना ही कार गेली कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pune News)

दरम्यान, वरंधा घाटातील रस्ता 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बंद केला आहे.
याबाबत आदेश पुणे (Pune) आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) काढले आहे.
घाटाच्या सुरुवातीला अडथळे म्हणून मातीचे ढिगारे लावून सूचनाही दिली आहे. त्यानंतर देखील काही वाहनधारक धोकादायक पद्धतीने जात असल्याचे समजते.

Web Title :  Pune News | traveling through the varandghat ghat during the ban car crashed into the neera deoghar dam

Related Posts