IMPIMP

Terrorist Arrest In Pune | कोथरूडमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱ्यास आर्थिक पुरवठा करणाऱ्या रत्नागिरी येथील एकाला अटक

by sachinsitapure
Terrorist Arrest In Pune | A man from Ratnagiri who provided financial support to terrorists

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्यातील कोथरूड परिसरातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना (Terrorist Arrest In Pune) कोंढव्यात (Kondhwa) आश्रय देण्यासाठी आर्थिक पुरवठा (Financial Supply) करणाऱ्या रत्नागिरी येथील एकाला महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra Pune ATS) अटक केली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी (Pune Police) 18 जुलै रोजी दोन संशयितांना अटक (Arrest) केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता ही कारवाई केली आहे. (Terrorist Arrest In Pune)

पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी Mohammad Yunus Mohammad Yakub Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले होते. तर मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam (वय 31) हा फरार झाला आहे. (Pune Crime News) आरोपींना पुण्यात आल्यानंतर आश्रय देण्यासाठी त्यांची मदत करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी (दि.26) अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (Terrorist Arrest In Pune )

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुण्यात पकडण्यात आलेल्या आरोपींना आश्रय देण्यासाठी सहाय्य करणाऱ्या आरोपीला आर्थिक पुरवठा करणाऱ्याचा शोध महाराष्ट्र एटीएस घेत होती. त्यावेळी एटीएसने रत्नागिरी मधील एकाला चौकशीसाठी बोलवले होते. चौकशी दरम्यान त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी परराज्यात गेलेल्या पोलीस पथकाने एका संशयित
व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.
तो आल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्यातील सहभागाबाबत तपास केला जाणार आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींचा फरार झालेला साथीदार तसेच फरार कालावधीत
मदत करणाऱ्यांचा तपास महाराष्ट्र एटीएस करत करत आहे.

 

Related Posts