IMPIMP

Pune News | येरवडा कारागृहात कैद्यांसाठी आता मोबाइल संपर्क योजना; कॉईनबॉक्सऐवजी आता मोबाइल

by nagesh
Pune News | Yerawada Jail Now Mobile Contact Scheme for Inmates; Mobile now instead of coinbox

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | जेलमधील कैद्यांना काही काळ घरच्या व्यक्ती व नातेवाईकांसोबत बोलण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संपर्कसाठी आतापर्यंत कॉईनबॉक्सचा वापर करण्यात येत होता. मात्र कॉईनबॉक्स ही सुविधा (Coin Box Facility) आता कालबाह्य झाली असून अनेक ठिकाणी ही सुविधा कार्यान्वित नाही. यामुळे कारागृह प्रशासनातर्फे कैद्यांच्या संपर्कासाठी स्मार्ट कार्ड योजना (Smart Card Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कारागृहातील कैद्यांना थेट मोबाइलद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधता येणार आहे. (Pune News)

पुण्यातील येरवडा कारागृहात राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. सुरुवातीला पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerawada Jail) ही स्मार्टकार्ड योजना प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आली आहे. ही योजना जर यशस्वी झाली तर राज्यभरातील इतर सर्व कारागृहात हिच स्मार्टकार्ड मोबाइल दूरध्वनी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेमध्ये कारागृह विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalander Supekar) आणि कारागृह विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजूनही कारागृहातील कैदी नातेवाईकांच्या संपर्कासाठी कॉइन बॉक्स सुविधेचा वापर करतात. आता ही सुविधा बाहेर जास्त उपलब्ध नाही. तसेच तो कॉइन बॉक्स खराब झाल्यास त्याचे पार्टही लवकर मिळत नाहीत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामातही व्यत्यय येतो. तसेच जर कैद्याला संपर्क करुन द्यायचा असेल तर प्रत्येक कैद्याला त्या कॉइन बॉक्सपर्यंत घेऊन जावे लागते हे देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. या सर्व बाबींचा विचार करुन कारागृहातील अधिक्षकांनी कॉइन बॉक्स सुविधेऐवजी साधे मोबाइल संच वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी प्रायोगिक तत्वावर स्मार्टकार्ड मोबाइल योजना सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

कारागृहातील प्रत्येक कैद्याला महिन्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिटांसाठी नातेवाईकांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आता या संपर्कासाठी मोबाईल फोनचा वापर केला जाणार आहे.
आता तरी ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली आहे.
तमिळनाडूतील (Tamil Nadu) ॲलन ग्रुप (Allen Group) आणि एल-69 ग्रुप (L-69 Group) या संस्थेमार्फेत
ही सुविधा पुरवली जाणार आहे. (Pune News)

Web Title : Pune News | Yerawada Jail Now Mobile Contact Scheme for Inmates; Mobile now instead of coinbox

Related Posts