Pune Pimpri Chinchwad Crime News | जामिनदाराची बनावट सही करुन दोघांची फसवणूक, पतसंस्थेच्या अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव यांच्यावर FIR; सदाशिव पेठेतील प्रकार
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जामिनदार म्हणून दोघांच्या बनावट सह्या करुन पतसंस्थेकडून 77 लाखांचे कर्ज घेतले. मात्र, घेतलेले कर्ज परतफेड न करता दोघांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेत (Ninad Nagari Sahakari Patasanstha ) डिसेंबर 2019 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, कोषाध्यक्ष व सचिव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत तानाजी दिनकर मोरे (वय-42 रा. तुकाईनगर, वडगाव बु., पुणे) यांनी गुरुवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन श्रीराम गॅस एजन्सीचे मयुरेश उदय जोशी (वय-38), उदय जोशी (वय-65 दोघे रा. सुवर्णनगरी सोसायटी, पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आनंदनगर, सिंहगड रोड पुणे), कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे (वय-66 रा. बालाजीनगर, धनकवडी), सचिव अशोक कुलकर्णी (वय-72 रा. सनसिटी सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 409, 420, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे श्रीराम गॅस एजन्सीमध्ये नोकरी करतात. गॅस एजन्सीचे मयुरेश जोशी
यांनी निनाद नागरी पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे. या कर्जप्रकरणासाठी मयुरेश याने फिर्यादी व एका महिलेला
काहीही माहिती न देता जामिनदार म्हणून त्यांच्या खोट्या सह्या केल्या होत्या.
आरोपींनी संगनमत करुन कर्ज मंजूर करत मयुरेश याला 77 लाख रुपयांचे कर्ज दिले.
मात्र, आरोपीने पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. आरोपींनी कर्जाबाबत फिर्य़ादी व महिलेला माहिती न देता तसेच कर्जाची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक नानेकर करीत आहेत.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल, तरुणावर FIR
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीवर संशय घेऊन खून, पतीवर गुन्हा दाखल; चतु:श्रृंगी परिसरातील घटना
- Pune News | गुड न्यूज! पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसरी महापालिका, जिल्ह्यातील ‘या’ गावांचा समावेश
Comments are closed.