IMPIMP

Pune Pimpri Crime | खोटे दस्तऐवज करुन कंपनीत 93 लाखांचा अपहार; पिंपरीतील घटना

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | कंपनी मालकाने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन खोटे दस्त (False Document)
तयार केले. याद्वारे कंपनीत तब्बल 92 लाख 98 हजार 900 रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात
(Pimpri Police Station) दोघांवर (Pune Pimpri Crime) आयपीसी 406, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा
प्रकार 2013 ते 2021 या दरम्यान फाल्कोईमोटर्स प्रा. ली. मोरवाडी (Falco Emotors Pvt. Lee. Morwadi) येथे घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश किंमतीलाल धनव उर्फ राकेशकुमार धनव Rakesh Nijra kimtilal Dhanaw alias Rakesh Kumar Dhanav (वय – 54 रा. ईमरसन लेन हॅरिसबर्ग वर्जिनिया, अमेरिका), दीपक अंकुश क्षीरसागर Deepak Ankush Kshirsagar (वय – 37 रा. चिखली) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भारतामध्ये नसताना त्यांनी कंपनीचे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी आरोपींना अधिकार दिले होते. या अधिकारांचा गैरवापर करुन कंपनीच्या 2016, 2017, 2018 च्या बोर्ड मिटींगमध्ये फिर्यादी या हजर असल्याचे दाखवले. आरोपी दीपक क्षीरसागर याने फिर्यादी यांची खोटी सही करुन स्वत: ला फिर्यादींचा रिप्रेजेंटेटीव्ह (Representative) म्हणून निवड झाल्याचे दाखवले.

 

तसेच कंपनीच्या 2015 ते 2018 च्या ऑडीट रिपोर्ट, बॅलेन्ससीट, प्रॉफीट अँड लॉस स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रावर फिर्यादी यांच्या सह्या केल्या.
हे सर्व कागदपत्रे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (Government of India Ministry of Corporate Affairs) अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले.
त्याचा वापर कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी करुन आरोपींनी खोटे दस्त ऐवज तयार करुन 92 लाख 98 हजार 900 रुपयांचा अपहार केला, असे फिर्यादीत नमूद केले.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे (Senior Police Inspector Shankar Avatade) करत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | 93 lakh embezzlement in the company by forging documents Incident in Pimpri

 

हे देखील वाचा :

BJP Parliamentary Board | भाजपच्या संसदीय समितीतून महाराष्ट्र ‘हद्दपार’, नितीन गडकरींना ‘वगळलं’ तर देवेंद्र फडणवीसांना ‘स्थान’ नाही

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 कडून गजाआड, पिस्टल आणि काडतुसे जप्त

Ajit Pawar | भाजपकडून अजित पवारांना घेरण्याची तयारी ? कंबोजांच्या ट्विटनंतर हालचालींना वेग, ‘ती’ केस पुन्हा ओपन होणार ?

 

Related Posts