IMPIMP

Pune Pimpri Crime | गुंडाच्या खूनाचा बदला घेण्याचे स्टेटस ठेवणारे गुन्हेगार ‘गोत्यात’

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | गाडीची हेडलाईट सुतळी बॉम्ब लावून फोडल्याने वाद होऊन एका सराईत गुन्हेगाराचा (Criminal) चिंचवडमध्ये खून (Murder) करण्यात आला होता. त्याचा फोटो स्टेटसवर ठेवून धमकाविचा व्हिडिओ पोस्ट करणार्‍या दोघा गुंडावर पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आतीश काळे Atish Kale (वय २५, रा. मोरवाडी, पिंपरी) आणि अर्जुन भिमराव वंजारी Arjun Bhimrao Vanjari (वय २४, रा. जिजामाता सोसायटी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत पोलीस शिपाई मोहसिन शेख (Police Constable Mohsin Shaikh) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९३६/२२) दिली आहे. हा प्रकार २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेबर दरम्यान घडला. (Pune Pimpri Crime)

 

पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक गठीत केले आहे़. ते गुंडांच्या सोशल मीडियावर हालचालींवर लक्ष ठेवून असतात.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन विष्णु लष्करे Pawan Vishnu Lashkare
(वय २३, रा. रामनगर, चिंचवड) या गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून नुकताच खून करण्यात आला होता.
लष्करे याने सोन्या जाधवच्या दुचाकीची हेडलाईट सुतळी बॉम्ब लावून फोडली होती.
तसेच अक्षय काळे याला देखील मारहाण (Beating) केली होती. या कारणावरुन आठ जणांच्या टोळक्याने पवन लष्करे याचा कोयत्याने वार करुन खून केला होता.
यामुळे पवन लष्करे याच्या टोळीतील साथीदार वचपा काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आतीश काळे याने त्यांचा मित्र अर्जुन वंजारी यांच्या मोबाईलवर पवन लष्करे याचा फोटो व त्यासोबत
‘‘ए दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरुर देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए,
तेरी मौत का बदला हम जरुर लेंगे’’
असा आवाजाचा व्हिडिओ पाठविला. तो करण भिमराव वंजारी याने त्याचे स्टेटसवर ठेवून समाजामध्ये दहशत पसरवून सार्वजनिक शांततेचा भंग केला.
हे आरोपी पवन लष्करे याच्या ग्रुपमधील असून त्यांच्याकडून पुन्हा काहीतरी दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता आहे,
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मिसाळ (Police Inspector Misal) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Criminals holding the status of avenging gangster’s murder ‘in the dark’

 

हे देखील वाचा :

Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कोथरूड-कर्वेनगर परिसरात कारवाई

Lingayat Community | राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा रविवारी पुण्यात

Maharashtra Police Recruitment | अखेर पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, कमाल वयोमर्यादेत शिथिलता; ‘या’ उमेदवारांना होणार फायदा

 

Related Posts