IMPIMP

Pune Pimpri Crime | समाजसेवा करतो म्हणून कोयत्याने सपासप वार करुन पत्नीचा केला विनयभंग; वाकड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | तुला समाजसेवा करण्याचा खुप किडा आला आहे का? आमच्या नादी लागु नको असे म्हणत एका व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार केले. तर घरात घुसून पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) सोमवारी (दि.21) सकाळी काळाखडक व हॉटेल केईएन समोरील फुटपाथवर घडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी सुरज सतीश वाघमारे (रा. काळाखड, वाकड) व त्याच्या साथीदारावर वाकड पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 354, 392, 452, 427, 34, आर्म अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादी या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपी सुरज आणि त्याचा साथीदार घरात घुसले. सुरजने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले तर त्याच्या साथीदाराने घरातील कपाटावर लाथा मारुन नुकसान केले. तसेच कपाटामधील रोख रक्कम 50 हजार आणि सोन्याचे दागिने चोरुन नेले. तसेच जाताना आरोपींनी तुझ्या नवरा भेटला की आज त्याला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

 

काहीवेळाने फिर्यादी यांचे पती हे गंभीर अवस्थेत घरी आले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले. फिर्यादी यांच्या पतीला आरोपींनी हॉटेल केईएन समोरील फुटपाथवर अडवून
तुला समाजसेवा करण्याचा खुप किडा आला आहे का? आमच्या नादाला लागू नको असे बोलून सुरजच्या सोबत
असलेल्या व्यक्तीने डोक्यात बांबू मारला. तर सुरज वाघमारे याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने फिर्यादी
यांच्या पतीच्या हाताच्या उजव्या दंडावर, पाठीवर, डाव्या पायांच्या मांडीवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिवटे करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | He molested his wife by stabbing her for doing social service; Incidents in Wakad area

 

हे देखील वाचा :

MLA Pratap Sarnaik | ‘एकनाथ शिंदे यांनी मला 900 खोके दिले, पण…’; बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांचा उद्धव ठाकरे गटाला टोला

MLA Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांना पुणे न्यायालयाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

 

Related Posts