IMPIMP

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

by nagesh
UGC 4 Year Graduation Program | ugc 4 year graduation program major development in education sector degree after 12th will take 4 years decision of ugc

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – UGC 4 Year Graduation Program | विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पदवी शिक्षणासाठी मोठा बदल केला आहे. पूर्वी 12 वी नंतर तीन वर्षात पदवी अभ्यासक्रम होता. पण आता हा अभ्यासक्रम 12 वी नंतर चार वर्षे करण्यात आला आहे. त्यामुळे आता पदवीसाठी विद्यार्थ्यांना 12 वी नंतर चार वर्षे द्यावी लागणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी पुढील वर्षापासून होणार आहे. (UGC 4 Year Graduation Program)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुढील आठवड्यात या निर्णयाची माहिती सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पाठविली जाणार आहे. यामध्ये 45 केंद्रीय विद्यापीठांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षापासून बी. ए., बी. कॉम., आणि बी. एससी., साठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला ग्रॅज्यूऐशनची पदवी मिळणार आहे. यूजीसीने चार वर्षांचा ग्रॅज्यूऐशन कार्यक्रम तयार केला आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठे, राज्य स्तरावरील विद्यापीठे आणि खासगी विद्यापीठे सर्वांना हा नियम लागू करण्यात आला आहे.

 

तसेच विद्यार्थ्यांना तीन वर्षात पदवी मिळविण्याचा देखील पर्याय खुला असणार आहे.
ज्यांनी चालू वर्षात प्रवेश घेतला आहे किंवा जे विद्यार्थी आता पदवी अभ्यासक्रम करत आहेत,
त्यांच्यासाठी ही सूट आहे. पुढील वर्षापासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पदवीसाठी चार वर्षे द्यावी
लागणार आहेत. तसेच चालू वर्षातील विद्यार्थी देखील हा पर्याय निवडू शकतात.
त्यामुळे यापुढे 12 + 4 म्हणजे पदवी असे गणित झाले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- UGC 4 Year Graduation Program | ugc 4 year graduation program major development in education sector degree after 12th will take 4 years decision of ugc

 

हे देखील वाचा :

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणामध्ये तरतुद होत नाही तो पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी’; भारतीय मराठा संघाचे महाराष्ट्र सरकारकडे निवेदन

Pune Crime | चाकणमधील ‘त्या’ महिलेचा खून प्रेमसंबंधातून, आरोपी प्रियकराला 24 तासात अटक

 

Related Posts